चाचणी कुठली करावी?
कोरोनासाठी - आरटीपीसीआर किंवा रॅपिड अँटिजन चाचणी
डेंग्यूसाठी - रक्ताची चाचणी
सर्दी, खोकला व ताप
डेंग्यू किंवा कोरोना झाल्यास रुग्णाला सर्दी, खोकला व ताप ही सर्वसाधारण लक्षणे आढळून येतात.
यासोबतच अंगदुखी, डोकेदुखी, अंगावर लाल चट्टे, उलटी, डोळे दुखणे, अशक्तपणा, डायरिया आदी लक्षणे डेंग्यूची आहेत.
कोरोना झाल्यास रुग्णाला सर्दी, खोकला, ताप येणे या लक्षणांशिवाय, थकवा येणे, धाप लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे, शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होणे आदी लक्षणे दिसून येतात.
पाणी उकळून प्या, डासांपासून सावध राहा
पावसाळ्याच्या दिवसात दूषित पाण्याचा पुरवठा होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे या दिवसांत जलजन्य आजारांपासून बचावासाठी नागरिकांनी पाणी उकळूनच प्यावे, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
पावसाळ्यात साचलेल्या स्वच्छ पाण्यातच डासांची उत्पत्ती होती. त्यामुळे छतावर किंवा इतर कुठल्याही ठिकाणी पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी. पिण्याच्या पाण्याचे भांडे आठवड्यातून एकदा स्वच्छ धुवावीत.
डासांपासून बचावासाठी मच्छरदाणीचा वापर करावा तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी संतुलित आहार आणि व्यायाम करावा, जेणेकरून कोरोना आणि डेंग्यूपासून स्वत:चा व कुटुंबीयांचा बचाव करता येईल.
डेंग्यूचे रुग्ण
२०१९ - ६१
२०२० - ३१
२०२१ - ००
कोरोना आणि डेंग्यूची प्राथमिक लक्षणे सारखीच आहेत. दोन्ही आजारांवर वेळीच उपचार झाल्यास रुग्ण बरा होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी लक्षणांकडे दुर्लक्ष न करता त्वरित डॉक्टरांच्या सल्ल्याने चाचणी करून घ्यावी.
- डॉ. आदित्य महानकर, जिल्हा हिवताप अधिकारी, अकोला