झोप का उडते?
१) विविध कारणांमुळे झोप उडते. आर्थिकसह विविध गंभीर स्वरुपाच्या अडचणी, मानसिक चिंता, हार्मोन्स कमी होणे, टेन्शन आदी कारणांमुळे झोप येत नाही तसेच झोप उडते.
२) मेंदुविकार, खोलीत लख्ख प्रकाश, गोंगाट किंवा आवाज आदी कारणांमुळेदेखील झोप उडू शकते.
३) जास्त वेळ टीव्ही बघणे, मोबाइलवर खेळत राहणे, हार्मोन्स कमी होणे, सकस आहाराचा व नियमित व्यायामाचा अभाव यामुळे झोप येत नाही.
झोप कमी झाल्याचे दुष्परिणाम
रोगप्रतिकार शक्ती कमी होणे.
आजाराशी लढण्याची शक्ती कमी होणे.
भूक कमी होणे, थकवा जाणवणे.
मानसिक समस्या निर्माण होणे.
नेमकी झोप किती हवी
नवजात बाळ - १२ ते १६ तास
एक ते पाच वर्षे - १२ ते १४
शाळेत जाणारी मुले - ८ ते १०
२१ ते ४० -६ ते ८
४१ ते ६० - ६ ते ८
६५ पेक्षा जास्त - ५ ते ६
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय झोपेची कोणतीही गोळी नको
विविध कारणांमुळे झोप येत नसेल तर कधी कधी अनेक जण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार झोपेची गोळी घेतात. मात्र, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय झोपेची गोळी घेणे आरोग्यासाठी हानिकारकही ठरू शकते. झोपेची गोळी काही वेळेला घेतली तर या गोळ्यांची सवयही जडू शकते. त्यामुळे सल्ल्याशिवाय झोपेची गोळी घेऊ नये, असे आवाहन डॉक्टरांनी केले.
झोपण्यापूर्वी आवडीचे संगीत, गाणे ऐकावे.
नियमित व्यायाम व सकस आहार असावा.
उष्ण पदार्थांचे सेवन टाळावे.
ताणतणाव नसावा. एखादा छंद जोपासावा.
० ते १८ वर्षे वयोगटातील मुला-मुलींच्या निरोगी जीवनासाठी पुरेशी झोप आवश्यक आहे. मुलांना शक्यतोवर मोबाइल, टीव्हीपासून दूर ठेवावे. पुरेशी झोप झाली नाही तर याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.
- डॉ. विनीत वरठे, बालरोगतज्ज्ञ, जीएमसी, अकोला
झोपेवर मानवाचे आरोग्य अवलंबून आहे. चांगली झोप झाली तर शरीराच्या हार्मोन्सवर चांगले परिणाम होतात. हार्मोन्स व पर्यायाने पचनक्रिया वाढते. प्रत्येक पेशीची कार्यक्षमता वाढते. झोप कमी झाली तर रोगप्रतिकार शक्तीही कमी होते.
-डॉ. श्रीकांत वानखडे, मानसोपचारतज्ज्ञ