अकोला : गत तीन महिन्यांपासून अकोला शहर व जिल्ह्यात प्रचंड धुमाकुळ घालत असलेल्या कोरोना विषाणूच्या संसर्गाचा वेग गत काही दिवसांपासून किंचीतसा मंदावल्याचे दिलासादायक चित्र आहे. सोमवार, १३ जुलै रोजी प्राप्त एकूण २५४ कोरोना संसर्ग अहवालांपैकी तब्बल २३९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर केवळ १५ अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे.पहिला रुग्ण ७ एप्रिल रोजी आढळून आलेल्या अकोल्यात मे महिन्यात कोरोना संसर्गाचा वेग वाढला. लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्यानंतर जुन महिन्यात दररोज मोठ्या संख्यने रुग्ण सापडण्याचे सत्र सुरुच राहून या महिन्यात एक हजारपेक्षाही अधिक रुग्ण वाढले. त्यामुळे नागपूरनंतर विदर्भातील सर्वाधिक कोरोनाबाधितांचे शहर अशी कुप्रसिद्धी अकोल्याची झाली आहे. गत काही दिवसांपासून मात्र कोरोना रुग्ण सापडण्याचे प्रमाण किंचीत घटले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून सोमवारी सकाळी २५४ जणांचे वैद्यकीय चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी २० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. तर उर्वरित २३९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. यामध्ये सात महिला, आठ पुरुष आहेत. त्यात तीन जण पातूर येथील, दोन जण नवीन बसस्टॅण्ड जवळ, दोन जण गोरक्षण रोड, दोन जण अकोट, दोन जण मुर्तिजापूर तर उर्वरीत गंगानगर, तेल्हारा, महान, खडकी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १८९४ झाली आहे.२८८ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरुआजपर्यंत एकूण १८९४ (१८७३+२१) पॉझिटीव्ह अहवालांची संख्या आहे. त्यातील ९४ जण (एक आत्महत्या व ९३ कोरोनामुळे) मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या १५१२ आहे. तर सद्यस्थितीत २८८ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.प्राप्त अहवाल-२५४पॉझिटीव्ह-१५निगेटीव्ह- २३९आता सद्यस्थितीएकूण पॉझिटीव्ह अहवाल- १८७३+२१= १८९४मयत-९४(९३+१)डिस्चार्ज- १५१२दाखल रुग्ण (अॅक्टीव्ह पॉझिटीव्ह)- २८८