शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आरोग्य विभागाच्या पथकाकडून नमुने घेण्यात आले. अनलॉक प्रक्रियेत २३ नोव्हेंबर २०२०पासून नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग शासनाच्या नियमांनुसार सुरू करण्यात आले. २७ जानेवारी २०२१ पासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू होणार असल्याची माहिती आहे. त्या पार्श्वभूमीवर शालेय व्यवस्थापन करत असताना सोशल डिस्टन्सिंग, वर्गखोल्यांची स्वच्छता याबाबतदेखील सूचना देण्यात आल्या आहेत.
शाळा सुरू होण्यापूर्वी ५८ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची आरटी-पीसीआर चाचणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आली. यावेळी हातरुण प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. भुस्कुटे, मुख्याध्यापक रविकुमार खेतकर, संतोष गव्हाळे, प्रशांत जोशी उपस्थित होते. (फोटो).
वर्गखोल्यांची साफसफाई तसेच शाळा सुरू करण्यासाठी नियोजन करण्याची लगबग सुरू आहे. शासनाच्या नियमानुसार शाळा सुरू करण्यात येईल. विद्यार्थी व पालकांचे सहकार्य आवश्यक आहे.
- रविकुमार खेतकर, मुख्याध्यापक, स्व. न.ब. अग्रवाल प्रा. आश्रमशाळा, हातरुण.
५८ शिक्षकांची तसेच कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी हातरुण येथील आरोग्यवर्धिनी केंद्रात शुक्रवारी करण्यात आली.
- डॉ. भुस्कुटे, प्रा. आरोग्य केंद्र, हातरुण