शहरं
Join us  
Trending Stories
1
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
2
"...मग पंतप्रधान कशाला होता, मुख्यमंत्री व्हा"; बारामतीतून शरद पवारांचा PM मोदींवर निशाणा
3
त्यांनी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण गहाण ठेवले होते; शिंदेंसाठी CM शिंदेंची बॅटिंग, ठाकरेंवर हल्ला
4
भारताच्या लाजिरवाण्या पराभवाने BCCI 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; गौतम गंभीरवर होणार प्रश्नांची सरबत्ती
5
UIDAI नं मोफत आधार कार्ड अपडेटची मुदत वाढवली, 'या' तारखेपर्यंत शुल्क लागणार नाही
6
IAS अधिकाऱ्याला मिठाईच्या बॉक्समधून लाच देणं नेत्याला पडलं महागात, पोलीस आले अन्....
7
सर्वोच्च न्यायालयाचा मदरशांना मोठा दिलासा, मदरसा कायदा घटनात्मक घोषित; हायकोर्टाचा निर्णय फिरला
8
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर; स्पष्टच बोलले
9
भाजपाला मोठा धक्का, अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या माजी महिला खासदाराचा पक्षाला राम राम
10
“कोल्हापूर उत्तर आम्ही ७ वेळा जिंकली, ७ दिवस भांडलो पण काँग्रेसने जागा सोडली नाही”: संजय राऊत
11
नवाब मलिकांवरून अजितदादा गटाने भाजपा-शिंदे गटाला फटकारलं; "कुणाला काही वाटू दे..."
12
राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग
13
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून यंदा काँग्रेसचेच चिन्ह झाले 'हद्दपार'
14
AUS vs IND : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा! टीम इंडियासमोर मोठे आव्हान, शिखर धवननं दिला धीर
15
Sameer Bhujbal : दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा
16
विराट कोहलीसाठी सिक्सर किंग युवीनं शेअर केली खास पोस्ट
17
महाले यांची माघार; भुजबळ, आहेर, गावित ठाम! दिंडोरीत नरहरी झिरवाळ यांना दिलासा
18
Niva Bupa IPO : 'या' दिग्गज हेल्थ इन्शूरन्स कंपनीचा IPO येणार; किंमत किती, कधीपासून करता येणार अर्ज?
19
"मी यापुढे मराठी बोलणार नाही..."; रेल्वे टीसीचा मुजोरपणा, मराठी माणसाला धमकावलं
20
चातुर्मासाची सांगता: कार्तिकी एकादशी कधी आहे? विष्णुप्रबोधोत्सव महात्म्य अन् मान्यता

...तर शनिवारपासून अकोल्यातच होणार ’कोरोना टेस्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 6:29 PM

चाचणीचा अडथळा पार करण्यात ही लॅब यशस्वी झाली, तर शनिवारपासून अकोल्यातच कोरोना चाचणीला प्रारंभ होणार आहे.

ठळक मुद्देराष्ट्रीय विषाणू संस्था (एनआयव्ही) पुणे मार्फत या लॅबच्या गुणवत्ता चाचणीला सुरुवात झाली.या चाचणीचा निकाल शनिवारी येणार आहे. शनिवारपासून अकोल्यातच कोरोना चाचणीला प्रारंभ होणार आहे.

अकोला : कोरोना विषाणूच्या चाचणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालयातील ‘व्हीआरडीएल’ला ‘आयसीएमआर’ने मंजुरी दिल्यानंतर शुक्रवारी राष्ट्रीय विषाणू संस्था (एनआयव्ही) पुणे मार्फत या लॅबच्या गुणवत्ता चाचणीला सुरुवात झाली. या चाचणीचा अडथळा पार करण्यात ही लॅब यशस्वी झाली, तर शनिवारपासून अकोल्यातच कोरोना चाचणीला प्रारंभ होणार आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतही शक्य तितक्या लवकर नमुन्यांची तपासणी करण्याच्या दिशेने काही दिवसांपासून प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. जीएमसीच्या परिसरात २०० चौरस मिटर जागेत या प्रयोगशाळेचे बांधकाम असून ‘आयसीएमआर’तर्फे प्रयोगशाळेला ५० लाख रुपये बांधकाम व अन्य स्थापत्य कामांसाठी देण्यात आले होते. प्रयोग शाळा उभारणीचे काम पूर्ण झाले असून, आवश्यक वैद्यकीय उपकरणांचेही इन्स्टॉलेशन झाले आहेत. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी ‘आयसीएमआर’ने मंजुरी दिली होती. राष्ट्रीय विषाणू संस्था, पुणे मार्फत शुक्रवारी गुणवत्ता चाचणी घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या चाचणीचा निकाल शनिवारी येणार आहे. यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पास झाल्यास शनिवारपासूनच अकोल्यात कोरोना रुग्णांची वैद्यकीय चाचणी घेण्यास सुरुवात केली जाणार आहे.

अकोल्यासह वाशिम, बुलडाण्यासाठी सोईचेअकोल्यातील प्रयोग शाळेत अकोल्यासह वाशिम आणि बुलडाणा जिल्'ातील रुग्णांची वैद्यकीय चाचणी घेतली जाणार आहे. ही लॅब एकाच दिवसात जवळपास ९० रुग्णांची वैद्यकीय चाचणी घेण्यास सक्षम असून, कोरोनाचे कमी वेळात निदान होण्यास मदत मिळणार आहे.

एनआयव्ही मार्फत अंतिम गुणवत्ता चाचणी घेण्यास सुरुवात झाली असून, शनिवारपर्यंत त्याचे निकाल येणार आहेत. यामध्ये पास झाल्यास उद्यापासूनच चाचणीला सुरुवात करणे शक्य होणार आहे.- डॉ. नितीन अंभोरे, विभाग प्रमुख, शुक्ष्मजीवशास्त्र विभाग, जीएमसी, अकोला

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय