राजुरा सरोदे गावात २३ जण पॉझिटिव्ह
जामठी बु. : येथून जवळच असलेल्या राजुरा सरोदे गावामध्ये ८ मे रोजी १३३ रुग्णांची कोरोना तपासणी करण्यात आली. यात रॅपिड टेस्टमध्ये ११ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामधील आरटीपीसीआरमध्ये १२ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला. या रुग्णांना पुढील उपचारासाठी मूर्तिजापूर येथे पाठविण्यात आले.
राजुरा सरोदे गावातील जास्तीत जास्त नागरिकांनी तपासणी करून घ्यावी. याकरीता प्राथमिक आरोग्य केंद्र जामठी बु. चे वैद्यकीय अधिकारी डाॅ. शेगोकार, सरपंच वनमाला आखरे, उपसरपंच अरविंद सरोदे, पर्यवेक्षकीय अधिकारी जाधव, ग्रामसेवक पोधाडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक बाळकृष्ण नलावडे, तलाठी दलाल, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका कोतवाल यांनी विशेष परिश्रम घेतले. १० मे रोजी तहसीलदार प्रदीप पवार व गटविकास अधिकारी बाळासाहेब बयस यांनी राजुरा सरोदे येथे भेट देऊन गावाची पहाणी केली. तसेच ग्रामसुधार समितीला मार्गदर्शन केले. यापूर्वीच दोनदा गावामध्ये फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात आले होते.