शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

अकोला शहराला ‘कोरोना’चा विळखा; चार झोनमधील सात प्रभागांमध्ये संसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2020 10:15 AM

उत्तर झोनमधील प्रभाग क्रमांक ११ कोरोनाचा ‘हॉटस्पॉट’ ठरल्याचे चित्र समोर आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: महापालिका क्षेत्रात अवघ्या २६ दिवसांमध्ये कोरोनाचे तब्बल ४७ रुग्ण आढळून आले आहेत. शहरातील चारही झोनमधील सात प्रभागांमध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पसरल्याचे समोर आले आहे. ही बाब लक्षात घेता मनपा प्रशासनाने संबंधित प्रभागांमध्ये सर्वेक्षण व आरोग्य तपासणी करण्यासाठी महापालिकेच्या २६० कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. यामध्ये प्रामुख्याने महापालिकेचे शिक्षक व आशा वर्कर यांचा समावेश आहे. महापालिका क्षेत्रात उत्तर झोन अंतर्गत येणाºया प्रभाग क्रमांक ११ मधील बैदपुरा परिसरातील ६१ वर्षीय इसमाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यानंतर हा आकडा दिवसेंदिवस वाढतच गेला. सद्यस्थितीत शहरातील उत्तर झोनमधील प्रभाग क्रमांक ११ कोरोनाचा ‘हॉटस्पॉट’ ठरल्याचे चित्र समोर आले आहे. दरम्यान, आज रोजी एकूण सात प्रभागांमध्ये कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. संबंधित रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांना महापालिका प्रशासनाने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असून, त्या सर्वांचे नमुने घेण्यात आले आहेत.या प्रभागांमध्ये सर्वेक्षणाला प्रारंभपूर्व झोनमधील प्रभाग क्रमांक १३ अंतर्गत येणाºया सुधीर कॉलनी व शिवर, पश्चिम झोनच्या प्रभाग क्रमांक ८ मधील मेहरे नगर, प्रभाग क्रमांक ९ मधील खैर मोहम्मद प्लॉट तसेच प्रभाग क्रमांक १८ मधील कमला नगर भागात सर्वेक्षणाला प्रारंभ करण्यात आला आहे.उत्तर झोनमधील प्रभाग क्रमांक दोन अंतर्गत येणाºया घुसर-आपातापा मार्गावरील शंकर नगर परिसराला ‘सील’ करण्यात आले असून, त्या ठिकाणी सर्वेक्षणाची प्रक्रिया सुरू केली आहे.

प्रत्येक झोनची आता ६५ कर्मचाऱ्यांवर मदारप्रतिबंधित क्षेत्र घोषित केलेल्या भागात सर्वेक्षण करणे व नागरिकांच्या दैनंदिन आरोग्य तपासणीसाठी प्रशासनाने उपलब्ध कर्मचाºयांची संख्या लक्षात घेता प्रत्येक झोनसाठी आता ६५ कर्मचाºयांची नियुक्ती केली आहे. या ६५ कर्मचाºयांच्या माध्यमातून त्या-त्या प्रभागातील सर्वेक्षण व आरोग्य तपासणीची जबाबदारी संबंधित क्षेत्रीय अधिकाºयांवर सोपविण्यात आली आहे. त्याचे नियोजन क्षेत्रीय अधिकारी करतील.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या