अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर थांबण्याची कोणतीही चिन्हे नसून, दिवसेंदिवस कोरोनाला बळी पडणाऱ्यांचा आकडा वाढतच आहे. शनिवार, २९ आॅगस्ट रोजी अकोट येथील वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा १४९ वर गेला आहे. तर २६ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३,८०१ वर पोहचली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून शनिवारी सकाळी २७९ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरत २५३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. पॉझिटिव्ह आलेल्या २६ रुग्णांमध्ये नऊ महिला व १७ पुरुषांचा समावेश आहे. काटखेड ता. बार्शीटाकळी येथील दोन, झोडगा ता. बार्शीटाकळी येथील दोन, मनब्दा ता. तेल्हारा येथील दोन, निंभा ता. मुर्तिजापूर येथील दोन, जीएमसी येथील दोन, निमवाडी येथील दोन, गणेश नगर येथील दोन, तर शास्त्री नगर, काटेपूर्णा ता. अकोला, महसूल कॉलनी, सिंधी कॉलनी, जवाहरनगर, जठारपेठ, डाबकी रोड, मोठी उमरी, आदर्श कॉलनी, हातरुन ता. बाळापूर, पळसो ता. अकोला, नायगाव, येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.अकोट येथील ७० वर्षीय महिलेचा मृत्यूजिल्ह्यात कोरोनाच्या बळींची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. अकोट येथील ७० वर्षीय महिलेचा शनिवारी पहाटे रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांना २५ आॅगस्ट रोजी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असतानाच शनिवारी त्यांची प्राणज्योत मालवली.५३४ अॅक्टिव्ह पॉझिटिव्हजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३,८०१ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ३११८ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १४९ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ५३४ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
कोरोनाने घेतला आणखी एक बळी; २६ नवे पॉझिटिव्ह; मृतांचा आकडा १४९ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 12:38 PM