अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून , रविवार, २७ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात आणखी एक कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा २२५ वर गेला. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ५६ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ७१६७ झाली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून रविवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे २३२ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ५९ अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १७३ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह निदान झालेल्या रुग्णांमध्ये मूर्तिजापूर येथील १३ जणांसह अकोट येथील सात, छोटी उमरी, डाबकी रोड व बाळापूर येथील प्रत्येकी तीन, मलकापूर, मोठी उमरी, बोरगाव मंजू, जीएमसी, शास्त्रीनगर व ओझोन येथील प्रत्येकी दोन, जोगळेकर प्लॉट, हिंगणा रोड, श्रीवास्तव चौक, डोंगरगाव, गजानन नगर, नानक नगर, कोठारी वाटिका, पत्रकार कॉलनी ,जुने शहर, पाथर्डी अकोट , वरुर, कुटासा, शिवापुर, कान्हेरी, रंजना नगर, आदर्श कॉलनी, सिंधी कॅम्प, देशमुख फाईल येथील प्रत्येकी रुग्णाचा समावेश आहे.बोरगाव मंजू येथी महिलेचा मृत्यूशनिवारी बोरगांव मंजू येथील ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. या महिलेस २४ सप्टेंबर रोजी दाखल करण्यात आले होते. रविवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.१,५७१ अॅक्टिव्ह पॉझिटिव्हजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ७,१६७ लोकांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ५३७१ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २२५ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत १,५७१ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.
कोरोनाने घेतला आणखी एक बळी; ५९ नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2020 12:39 PM