दर दिवसाला ५०० नागरिक लस घेत आहे. लस देण्यासाठी पाच प्राथमिक आरोग्य केंद्र ज्यामध्ये पातूर, बाभुळगाव, आलेगाव, मळसुर, सस्ती हे असून ११ उपकेंद्र आहेत. ज्यामध्ये खानापूर, आगीखेड, शिर्ला, नांदखेड, माळराजुरा, बोडखा, आलेगाव, अंबाशी, चरणगाव, वरणगाव, पिंपरडोळी चोंढी, सावरगाव आणि उमरा, सस्ती, तुलंगा, चान्नी आदी केंद्रांचा समावेश आहे. कोविड लसीचा साठा संपल्याने लवकरच आणखी साठा उपलब्ध होणार असल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले. पातूर शहरामध्ये तीन ठिकाणी तहसील कार्यालय, युनियन बँक,को- ऑपरेटिव्ह बँकमध्ये काही काळापर्यंत नागरिकांच्या तपासण्या करण्यात आल्या. मात्र आता पातूर तहसील कार्यालयामध्ये नागरिकांनी प्रथम नाव नोंदवून घेतल्यानंतर त्यांची तपासणी करून पावती लगेच देण्यात येत आहे. त्यामुळे बँकांमध्ये काम असणाऱ्या नागरिकांना पातूर तहसील कार्यालयातून सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये दररोज दीडशे ते दोनशे नागरिक तपासणी करीत आहेत. अहवाल येण्यासाठी वेळ लागत आहे. मात्र कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या नावाची जिल्हास्तरावरून अहवालाची तात्काळ यादी तालुकास्तरावर पाठविली जात आहे. पॉझिटिव्ह रुग्णांना त्यांच्या सोयीनुसार त्यांच्या घरातच सुविधा असल्यास, क्वारंटाईन राहण्यास सांगण्यात येत आहे. ज्यांच्याकडे सुविधा नाही. त्यांची प्रशासनाच्या केंद्रामध्ये रवानगी करण्यात येत आहे.
पातूर शहरासह तालुक्यात ४ हजारावर नागरिकांनी घेतली कोरोना लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 4:16 AM