शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
2
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
3
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
4
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
5
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
6
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
7
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
9
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
10
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
11
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
12
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
13
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
14
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
15
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
16
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
17
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने नोकऱ्यांवर गदा? भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचे भविष्य अंधारात
19
ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड! भारतानंतर IPL लिलावात कोणत्या देशाच्या खेळाडूंची सर्वाधिक नावे?
20
कडक सॅल्यूट! जन्मापासूनच दिसत नव्हतं; नेत्रदिपक कामगिरी करत झाल्या IFS अधिकारी

अकोल्यात कोरोना बळीचे शतक; ३० पॉझिटिव्ह रुग्णांची भर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 10:31 AM

शुक्रवार, १७ जुलै रोजी कोरोनाचा १00 वा बळी नोंदविल्या गेला.

ठळक मुद्दे‘आरटीपीसीआर’ चाचणी अहवालांमध्ये २१ पॉझिटिव्ह आढळून आले. रॅपिड अ‍ॅन्टिजेन टेस्ट मोहिमेत नऊ जण पॉझिटिव्ह आढळून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर थांबण्याची कोणतीही चिन्हे नसून, शुक्रवार, १७ जुलै रोजी कोरोनाचा १00 वा बळी नोंदविल्या गेला. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून प्राप्त ‘आरटीपीसीआर’ चाचणी अहवालांमध्ये २१ जण, तर रॅपिड अ‍ॅन्टिजेन टेस्ट मोहिमेत नऊ जण असे एकूण ३० जण पॉझिटिव्ह आढळून आले. यामुळे एकूण बाधितांची संख्या २,०५७ झाली आहे. दरम्यान, २७ जणांना डिस्चार्ज देण्यात आल्याने सद्यस्थितीत २८२ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शुक्रवारीसकाळी २९७ जणांचे वैद्यकीय चाचणी अहवाल प्राप्त झाले. यामध्ये १५ पॉझिटिव्ह आढळून आले. या रुग्णांमध्ये अकोट, मूर्तिजापूर, सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी दोन, तर बोरगाव मंजू, लोकमान्य नगर, सिद्धिविनायक हॉस्पिटल, शंकरनगर, रामगर, जीएमसी होस्टेल, तेल्हारा, बादखेड ता. तेल्हारा आणि पातूर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. सायंकाळी सहा जणांचे पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले. यामध्ये उमरी, सातव चौक, सिंधी कॅम्प, लोहारा ता. बाळापूर, मूर्तिजापूर, हिवरखेड ता. तेल्हारा येथील रुग्णांचा समावेश असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.आतापर्यंत ९९ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून, १,६६७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत २९१ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.मूर्तिजापूर तालुक्यात एकाचा मृत्यूमूर्तिजापूर : तालुक्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, शुक्रवारी जितापूर खेडकर येथील ७५ वर्षीय कोरोनाबाधित पुरुषाचा मृत्यू झाल्याने मृतकांचा आकडा तीन झाला आहे. जितापूर येथील या व्यक्तीस गत चार ते पाच दिवसांपूर्वी अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गुरुवारी रात्री त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. शुक्रवारी दुपारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते, लदेसाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र नेमाळे व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.रामचरण राठोड यांनी दुजोरा दिला आहे.रॅपिड टेस्ट: ३२३ चाचण्यांमध्ये नऊ पॉझिटिव्ह1 रॅपिड अ‍ॅन्टीजेन टेस्ट मोहिमेदरम्यान शुक्रवारी दिवसभरात झालेल्या ३२३ चाचण्यांमध्ये नऊ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली. आज दिवसभरात अकोला मनपा हद्दीत २४ चाचण्या झाल्या. त्यामध्ये एकही पॉझिटिव्ह नाही. (आजपर्यंत अकोला मनपा हद्दीत २२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.)2 अकोला ग्रामीणमध्ये ७२ चाचण्या होऊन त्यामध्ये २ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. तेल्हारा येथे ६५ जणांच्या होऊन एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. बाळापूर येथे ४३ चाचण्या झाल्या. तेथे एकही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. पातूर येथे ५८ चाचण्या झाल्या. त्यात सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. बार्शीटाकळी येथे ६१ चाचण्या झाल्या. त्यात एकाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही.दिवसभरात ३२३ चाचण्यांमध्ये नऊ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आजअखेर जिल्ह्यात १,४३२ रॅपिड अ‍ॅन्टीजेन टेस्टद्वारे ९८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या