अकोला : अकोला शहर व जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, या संसर्गजन्य आजाराला बळी पडणाऱ्यांची व लागण होणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढतच आहे. शनिवार, ४ जुलै रोजी आणखी चौघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर ४८ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यामुळे कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा ८८ झाला आहे. तर एकूण रुग्ण संख्या १६६५ वर गेली आहे. दरम्यान, शनिवारी ३३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.विदर्भात नागपूरनंतर सर्वाधिक कोरोनाबाधितांचे शहर अशी ओळख झालेल्या अकोल्यात रुग्णांचा व कोरोनाच्या बळींचा आकडा दररोज वाढत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी सकाळी एकूण ३५४ जणांचे वैद्यकीय चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी ४८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. तर ३०६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह ४८ अहवालांमध्ये १५ महिला व ३३ पुरुष आहेत. त्यातील १४ जण पातूर येथील, १२ जण बाळापूर येथील, अकोट येथील पाच जण, खोलेश्वर येथील चार जण, लहान उमरी, डाबकी रोड व जीएमसी होस्टेल येथील प्रत्येकी दोन जण तर बार्शीटाकळी, गिरीनगर, गंगानगर, अकोट फैल, वाशीम बायपास, आदर्श कॉलनी व वाशीम येथील प्रत्येकी एक जण याप्रमाणे रहिवासी आहेत.चौघांचा मृत्यूकोरोनामुळे शनिवारी चौघांंच्या मृत्यूची नोंद झाली. यापैकी महान बार्शीटाकळी येथील २४ वर्षीय महिला, व अकोला शहरातील खैर मोहम्मद प्लॉट भागातील ७२ वर्षीय पुरुषाचा शनिवारी मृत्यू झाला. तर बाळापूर येथील ३६ वर्षीय पुरुष व अकोट येथील ७२ वर्षीय पुरुषाचा शुक्रवारी रात्री मृत्यू झाला. ३३ जण कोरोनामुक्तशनिवारी दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून चार तर कोविड केअर सेंटर मधून २९ अशा एकूण ३३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून डिस्चार्ज देण्यात आलेले रुग्ण हे श्रीवास्तव चौक, शिवाजीनगर, हरिहर पेठ व पारस येथील रहिवासी आहेत, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून कळविण्यात आले. तर कोविड केअर सेंटर मधून डिस्चार्ज देण्यात आलेले रुग्ण हे सहा जण आंबेडकर नगर येथील, पाच जण अकोट फैल येथील, जुने शहर, अशोक नगर व राधाकिसन प्लॉट येथील प्रत्येकी तीन जण, हरिहर पेठ येथील दोन जण तर कौलखेड, दगडीपुल, सिंधी कॅम्प, बसेरानगर, अकोट, हिंगणा, भिमनगर येथील रहिवासी आहेत,असे कोविड केअर सेंटर मधून कळविण्यात आले आहे .सद्यस्थितीत ३२२ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. आता सद्यस्थितीएकूण पॉझिटीव्ह अहवाल-१६६५मयत-८८(८७+१)डिस्चार्ज १२५५दाखल रुग्ण (अॅक्टीव्ह पॉझिटीव्ह)-३२२