पाच महिला, चार पुरुषांचा मृत्यू
खडकी येथील ४५ वर्षीय महिला, खरप येथील ५८ वर्षीय महिला, जठारपेठ येथील ५४ वर्षीय पुरुष, वाडेगाव, ता. बाळापूर येथील ६९ वर्षीय महिला, अकोट येथील ७५ वर्षीय महिला, डाळंबी येथील ६५ वर्षीय पुरुष, विवरा ता. पातूर येथील ६७ वर्षीय पुरुष, मोठी उमरी येथील ५० वर्षीय महिला आणि वाडेगाव ता. बाळापूर येथील ३२ वर्षीय पुरुष अशा नऊ रुग्णांचा कोरोनावर उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
२१९ जणांना डिस्चार्ज
देवसर हॉस्पिटल येथून आठ, उपजिल्हा रुग्णालय मूर्तिजापूर येथून एक, कोविड केअर सेंटर, अकोट येथून एक. युनिक हॉस्पिटल येथून चार, हॉटेल स्कायलार्क येथून दोन, अवघाटे हॉस्पिटल येथून तीन, सहारा हॉस्पिटल येथून एक, आयकॉन हॉस्पिटल येथून दोन, ओझोन हॉस्पिटल येथून दोन, नवजीवन हॉस्पिटल येथून पाच, बिहाडे हॉस्पिटल येथून सात, खैर उम्मत हॉस्पिटल येथून एक, हॉटेल रिजेन्सी येथून सात, आधार हॉस्पिटल मूर्तिजापूर येथून एक, युनिक हॉस्पिटल येथून एक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून २८ तर होम आयसोलेशनमधील १४५ अशा एकूण २१९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
येथे आढळले पॉझिटिव्ह रुग्ण
सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये पारस येथील १६, अकोट येथील १४, कौलखेड येथील १०,पातूर, बाळापूर येथील प्रत्येकी नऊ, मूर्तिजापूर,साहित, गोरक्षण रोड येथील प्रत्येकी सात, तेल्हारा येथील सहा, डाबकी रोड, सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी पाच, जीएमसी, शास्त्रीनगर येथील चार, तरोडा खानापूर, एन.पी. कॉलनी, मलकापूर, लोणी कदमपूर येथील प्रत्येकी तीन, कापशी, गजानन नगर, गोकूळ कॉलनी, कीर्ती नगर, शिवर, लहान उमरी, देऊळगाव, खडकी येथील प्रत्येकी दोन, खदान, निंबी, दहातोंडा, कन्हेरी सरप, नवापूर, चिखलगाव, विझोरा, हिंगणा, आलेगाव, शिवनार, बारालिंगा, पास्टुल, देवी खदान, राधाकिसन प्लॉट, तापडिया नगर, न्यू तापडिया नगर, तारफाईल, जठारपेठ, महान, बेलुरा, बार्शीटाकळी, श्रीराम नगर, महसूल कॉलनी, वरुर, वलवाडी, रविनगर, बोरगाव मंजू, अमान खा प्लॉट, साई नगर, आदर्श कॉलनी, रेणुका नगर, कासरखेड, जवाहर नगर, गीतानगर, खडकी, बटवाडी, चांदूर, आरोग्य नगर, कासुरा, रणपिसेनगर, गायत्री नगर, बालाजी नगर, चैतन्यवाडी, देशमुख फाईल, जुने शहर, गोडबोले प्लॉट, अनिकट, हरिहर पेठ, शिवसेना वसाहत, रजपुत पुरा, बंजारा नगर, अकोट फाईल, तोष्णिवाल ले आऊट, मोठी उमरी आणि उगवा येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
सायंकाळी शास्त्री नगर येथील सात, जठारपेठ येथील पाच,डाबकी रोड, अकोट, उत्तरा कॉलनी, मोठी उमरी येथील प्रत्येकी चार, जीएमसी, लहानुमरी, नवोदय विद्यालय बाभुळगाव, मलकापूर, रणपिसे नगर, खडकी, कौलखेड येथील प्रत्येकी तीन, रेडवा, रुईखेड, गोकूळ कॉलनी, रामदास पेठ, विद्यानगर, शिवर, पारड, आळशी प्लॉट, पैलपाडा, सागद, आझाद कॉलनी येथील प्रत्येकी दोन तर उर्वरित पारस, जामवसू, वस्तापूर, उजाळेश्वर, टेंभी, टिटवा, आंबोडा, निम्बी मालोकार, अकोली जहागीर, मनब्दा, घोडेगाव, खदान, तेल्हारा, पिंजर, गुडघी, गीता नगर, संताजी नगर, सातव चौक, विठ्ठल नगर, जवाहर नगर, तारफाईल, न्यू तापडिया नगर, द्वारका नगरी, हिंगणी बु., राऊतवाडी, रतनलाल प्लॉट, वाडेगाव, समिर नगर, अन्वी मिर्जापूर, बैदपूरा, खेडकर नगर, बोरगाव मंजू, अनिकट, न.पा. कॉलनी, जनुना, उगवा, काजळेश्वर, निम्बा, शिवनी, मूर्तिजापूर, गिरीनगर, बाभुळगाव जहागीर, हिंगणा येथील प्रत्येकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
३,९०९ ॲक्टिव्ह रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३०,८२७ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल २६,४१० रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ५०८ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ३,९०९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.