शहरं
Join us  
Trending Stories
1
कट्टर नेत्यांच्या बंडामुळे चिंता; दाेन दिवस मनधरणीचा फराळ, वर्षानुवर्षे संघ अन् भाजपत सक्रिय असलेल्यांचेच धक्के
2
आजचे राशीभविष्य, २ नोव्हेंबर २०२४: पूर्ण दिवस आनंद व उत्साहात जाईल, कामे सफल होतील!
3
भीषण आगीत सिलेंडरचा स्फोट; चार दुकाने जळून खाक! मुंब्रा-शिळफाटा परिसरातील घटना
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: एकीकडे अब्दुल सत्तार यांना दणका, दुसरीकडे अरविंद सावंतांवर गुन्हा
5
महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ कोल्हापुरातून, मंगळवारी ‘तपोवन’वर होणार पहिली सभा 
6
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोने-चांदीत घसरण, खरेदीचा मुहूर्त साधण्यासाठी सुवर्ण पेढ्यांमध्ये उत्साह
7
मंत्र्यांच्या संपत्तीची कोटीच्या कोटी उड्डाणे, मंत्री लोढा वगळता पाच वर्षांत सर्व मंत्र्यांच्या संपत्तीत भरघोस वाढ
8
शायनांबद्दल अपशब्द; खासदार अरविंद सावंतांवर गुन्हा; विधानसभा निवडणुकीत नव्या मुद्द्याला ताेंड
9
सर्वांनी मिळून एकच उमेदवार ठरवावा : मनोज जरांगे पाटील
10
निवडणूक आयोगाचा अब्दुल सत्तार यांना दणका; मालमत्तेची खोटी माहिती दिल्याचे प्रकरण
11
मुहूर्ताला मुंबई शेअर बाजारात तेजीचे फटाके; सोने-चांदीच्या भावात घसरण
12
एमबीबीएसच्या प्रवेशांची माहिती सादर करा, महाविद्यालयांना ८ नोव्हेंबरपर्यंत मुदत
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांचाही राज्यात धडाका 
14
महायुती, मविआला अपक्षांचे आव्हान?  मुंबईतील दहा मतदारसंघांत उमेदवारांना टेन्शन
15
शिष्यवृत्तीला उशीर झाल्यास विद्यापीठ, महाविद्यालय जबाबदारउच्च शिक्षण संचालनालयाचे निर्देश; प्रलंबित अर्जांची पडताळणी करा
16
सोने करणार मालामाल, सर्व विक्रम मागे पडणार! वर्षभरात ४१ वेळा गाठला उच्चांक, दरात ३४ टक्के वाढ
17
२२ व्या मजल्यावरून उडी मारत महिलेची आत्महत्या, कासारवडवलीतील घटना
18
गिटार खरेदीमध्ये दुकानदाराला गंडा, बोगस यूपीआय क्रमांक दाखवत लुबाडले
19
दिवाळीत ट्रम्प यांचा नवा डाव, हिंदू अधिकारांच्या रक्षणाचा मुद्दा, चक्र फिरणार?
20
मतदार यादी अन् बूथ हीच आता युद्धभूमी... लोकसभेच्या पराभवानंतर भाजपची नवीन रणनीती

Big Breaking : अकोल्यात कोरोनाचा पहिला बळी; मृत्यू झालेल्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 11:52 AM

अकोला शहरातील एका ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू सोमवारी रात्री झाला.

ठळक मुद्देरुग्णाला मधुमेह, उच्च रक्तदाबाची समस्या होती.रात्री ८.३० वाजताच्या सुमारास रुग्णाचा मृत्यू झाला होता.सध्या जिल्ह्यात १२ कोरोना बाधित रुग्ण आहेत.

अकोला : जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूने अकोल्यात हातपाय पसरल्यानंतर आता अकोल्यात या विषाणूच्या पहिल्या बळीची नोंद झाली आहे. कोविड-१९ हा आजार झालेल्या अकोला शहरातील एका ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू सोमवारी रात्री झाला. सदर व्यक्तीचा वैद्यकीय अहवाल बुधवारी पॉझिटीव्ह आल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून देण्यात आली. अकोल्यात कोरोनाच्या पहिल्या बळीची नोंद झाली असून, त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात कोरोनाचे १३ पॉझिटीव्ह रुग्ण होते. यापूर्वी एका रुग्णाने आयसोलेशन कक्षात आत्महत्या केल्यामुळे आता १२ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

प्राप्त माहितीनुसार, शहरातील ४५ वर्षीय एक ाव्यक्तीला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने सोमवार १३ एप्रिल रोजी सायंकाळी सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अपघात कक्षात त्यावर प्राथमिक उपचार सुरू असतानाच रात्री ८.३० वाजताच्या सुमारास रुग्णाचा मृत्यू झाला होता. दरम्यान खबरदारी म्हणून त्या रुग्णाचे घशातील स्त्रावाचे नमुने वैद्यकीय चाचणीसाठी घेण्यात आले होते. मंगळवारी त्या रुग्णाचा वैद्यकीय चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली. आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून, त्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची तपासणी करुन त्यांना रुग्णालयात दाखल केले जात आहे. 

रुग्णाला होता मधुमेहाचा आजाररुग्णाला मधुमेह, उच्च रक्तदाबाची समस्या होती. शिवाय, त्याला खोकलाही असल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनातर्फे सांगण्यात येत आहे. 

१२ बाधित रुग्णांवर उपचार सुरू सर्वोपचार रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात १२ कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहे. आतापर्यंत अकोल्यात कोरोना बाधितांची संख्या एकूण १४ वर पोहोचली असून, त्यापैकी एकाने आत्महत्या केली होती, तर दुसºया व्यक्तीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामध्ये सध्या जिल्ह्यात १२ कोरोना बाधित रुग्ण आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्या