अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, गत दोन दिवसांत अकोला शहर, मुर्तीजापूर व बाळापूर तालुक्यातील हातरुण येथील चौघांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा १५६ वर पोहचला आहे. दरम्यान, बुधवारी आणखी ६२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण रुग्णसंख्या ४१३२ झाली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून बुधवारी ३६६ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ६२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरीत ३०४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांमध्ये २० महिला व ४२ पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये एकट्या मुर्तीजापूरातील २४ जणांसह, आलेगाव येथील सहा जण, गोरक्षण येथीले चार, डाबकी रोड, सिंधी कॅम्प, पातूर येथील प्रत्येकी तीन जण, मलकापूर, शिवचरण पेठ, कृषी नगर येथील प्रत्येकी दोन जण, रणपिसे नगर, गणेश नगर, कान्हेरी गवळी, ज्योती नगर, बाळापूर, बोरगांव मंजू, जुने शहर, कौलखेड, वाडेगाव, जठारपेठ, मोठी उमरी, कुरणखेड व इंदिरा नगर येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे.चौघांचा मृत्यूबुधवारी रामदास पेठ, अकोला येथील ७६ वर्षीय पुरुष व मुर्तिजापूर येथील ६५ वर्षीय पुरुष या दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दोघांना अनुक्रमे २६ व २८ आॅगस्ट रोजी दाखल करण्यात आले होते. मंगळवारी हातरुण येथील ५० वर्षीय पुरुष व मुर्तीजापूर येथील ८० वर्षीय पुरुष या दोघांचा मृत्यू झाला होता.७२३ अॅक्टिव्ह पॉझिटिव्हजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ४,१३२ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ३,२५२ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १५६ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ७२३ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
कोरोनाचा कहर सुरुच; दोन दिवसात चौघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2020 12:50 PM