अकोला : गत काही महिन्यांपासून जिल्ह्यात धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना संसर्गाचा वेग कमी झाला असला, तरी मृत्यूचे सत्र मात्र सुरुच आहे. शुक्रवार, ९ आॅक्टाबर रोजी जिल्ह्यात आणखी तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा २५२ वर गेला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये सात नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ७७६० झाली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शुक्रवारी सकाळी आरटीपीसीआर चाचण्यांचे ११३ अहवाल प्राप्त झाले. यापैकी सात रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १०६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह निदान झालेल्या रुग्णांमध्ये दिग्रस ता. पातूर, व्याळा ता.बाळापूर, जीएमसी क्वॉर्टर, राजीव गांधी नगर, जीएमसी, कोठारी नगर व निंबा ता. बाळापूर येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे.कोरोनाबळींचा आकडा २५२ वरशुक्रवारी आणखी तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामध्ये निंभोरा येथील ५६ वर्षीय पुरुष, फिरदोस कॉलनी येथील ६८ वर्षीय पुरुष व तेल्हारा येथील ३५ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. तिघांनाही अनुक्रमे ७ आॅक्टोबर, १८ सप्टेंबर व २३ सप्टेंबर रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या तिघांच्या मृत्यूमुळे जिल्ह्यात कोरोनाबळींचा आकडा २५२ वर गेला आहे.८१३ अॅक्टिव्ह पॉझिटिव्हजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ७,७६० जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ६६९५ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २५२ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ८१३ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.
कोरोनाबळींचे सत्र सुरुच; आणखी तिघांचा मृत्यू; सात नवे पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2020 12:02 PM