शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

Coronavaccine अकोला जिल्ह्यात कोरोना लसीकरणास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 3:00 PM

Coronavaccine News: डॉ. आशिष गिऱ्हे यांना पहिली लस देण्यात आली.

ठळक मुद्दे ‘कोविन ॲप’ मधील नोंदींनुसार  नोंदविलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणास सुरुवात करण्यात आली. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व अन्य मान्यवरांनी प्रत्यक्ष पाहणी केली.

अकोला: जिल्ह्यात शनिवार १६ जानेवारी रोजी  कोविड लसीकरणाची सुरुवात  जिल्हा स्त्री रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ऑर्बीट हॉस्पीटल या तीन केंद्रावर करण्यात आली.

प्रारंभी जिल्हा स्त्री रुगालयाच्या कोविड लसीकरण केंद्र येथे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. लसीकरण केंद्राची फित कापून जिल्हाधिकाऱ्यांनी विधीवत प्रारंभ केला. यावेळी विधान परिषदेचे सदस्य डॉ. रणजीत पाटील, विधान सभा सदस्य आ. गोवर्धन शर्मा, आ.रणधीर सावरकर,  जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष प्रतिभाताई भोजने,उपाध्यक्ष सावित्रीताई राठोड,मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा आरोग्य अधिकारी सुरेश आसोले, जिल्हा स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक आरती कुलवाल आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

अशी झाली सुरुवात

 लसीकरणासंबंधित डाटा संकलित केलेल्या ‘कोविन ॲप’ मधील नोंदींनुसार  नोंदविलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणास सुरुवात करण्यात आली. यावेळी  लसीकरण करुन घेण्यासाठी नोंदणी कक्षात आलेल्या व्यक्तिस टोकन देऊन, नाव नोंदणी करण्यात आली. त्यानंतर ओळखपत्र वा आधार कार्डच्या आधारे नोंदणीची ऑनलाईन पडताळणी करण्यात आली. त्यानंतर लसीकरण कक्षात लस घेणाऱ्या व्यक्तीच्या सर्व शंकांचे निरसन करुन लस टोचण्यात आली. त्यानंतर झालेल्या लसीकरणानंतर संबंधित व्यक्तिस काही परिणाम जाणवतात वा लक्षणे दिसतात का याबाबत निरीक्षण करण्यासाठी त्या व्यक्तीस निरीक्षण कक्षात ठेवण्यात आले.

अकोला जिल्ह्यात पहिली लस जिल्हा स्त्री रुग्णालयाचे डॉ. आशिष गिऱ्हे    यांना देण्यात आली. या सर्व टप्प्यावर लसीकरण अधिकारी व त्यांचे कर्मचारी तैनात होते.

या लसीरकणाच्या विविध टप्प्यांची जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व अन्य मान्यवरांनी प्रत्यक्ष पाहणी केली. लसीकरण करण्यात आलेल्या व्यक्तीची जिल्हाधिकारी यांनी व्यक्तीश: विचारपूस केली. आज पहिल्या टप्प्यात तिन्ही केंद्रावर प्रत्येकी 100 याप्रमाणे आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात येत आहे. एकूण 15 टप्प्यात 4 हजार500 आरोग्य कर्मचाऱ्यास लस देण्यात येणार आहे. त्यानंतर पोलिस दल, लष्कर, महसूल कर्मचारी व इत्तर कर्मचाऱ्यांना लस देण्यात येईल. पुढील टप्प्यात 50 वर्षावरील सर्व नागरिक 50 वर्षाखालील मधुमेह, रक्तदाब, कर्करोग व इत्तर दुर्धर आजार असलेल्या नागरिकांना देण्यात येणार आहे.

लसीकरण केल्यानंतर घ्यावयाची काळजी

लसीकरणानंतरही मास्क वापरणे, हात स्वच्छ करणे व सामाजिक अंतर ठेवणे, या तीन सुत्राचे पालन करणे आवश्यक राहील. प्रत्येक लाभार्थ्यींना पहिली लसीकरण केल्यांनतर त्या व्यक्तीस किमान 28 दिवसानी दुसरा लसीकरणाचा डोस देण्यात येईल.जिल्हाधिकारी यांनी स्त्री रुग्णालयाच्या लसीकरण केंद्रानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ऑर्बीट हॉस्पीटल येथील लसीकरण केंद्रास भेट देवून पाहणी केली व तेथील आरोग्य कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्यात.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसAkolaअकोला