शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
5
२५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
6
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
7
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
8
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
9
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
10
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
11
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
12
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
13
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
14
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
16
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
17
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
18
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
19
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?

CoronaViru in  Akola : दिवसभरात दोघांचा मृत्यू; २२ नवे पॉझिटिव्ह, ४४ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2020 6:05 PM

CoronaViru in  Akola : २२ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ७७१३ झाली आहे.

अकोला : गत काही महिन्यांपासून जिल्ह्यात धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना संसर्गाचा वेग कमी झाला असला, तरी मृत्यूचे सत्र मात्र सुरुच आहे. बुधवार, ७ आॅक्टाबर रोजी अकोला शहरातील एक व दहीहांडा येथील एक अशा दोघांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा २४८ वर गेला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये २२ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ७७१३ झाली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून बुधवारी सकाळी आरटीपीसीआर चाचण्यांचे २०१ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २२ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १७९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह निदान झालेल्या रुग्णांमध्ये मूर्तिजापूर, मलकापूर, तापडिया नगर व पारद ता. मूर्तिजापूर येथील प्रत्येकी दोन, जठारपेठ, न्यू भीमनगर, लेबर कॉलनी, गजानन नगर, गांधीग्राम, वरूर जाऊळका ता.अकोट, आलेगाव ता. पातूर व अकोट येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे. सायंकाळी जठारपेठ, मलकापूर, कौलखेड, सिंदखेड, खडकी व वाडेगाव येथील रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.महिला व पुरुषाचा मृत्यूकोरोनामुळे बुधवारी आणखी दोघांचा मृत्यू झाला. यामध्ये कृषी नगर , सिव्हील लाईन येथील ४३ वर्षीय महिला व दहीहंडा येथील ६५ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. दोघांनाही अनुक्रमे २४ व २६ सप्टेंबर रोजी उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.२२ जणांना डिस्चार्जबुधवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून १९, कोविड केअर सेंटर, अकोला येथून १२, सुर्यचंद्र हॉस्पीटल येथून एक, हॉटेल रिजेन्सी येथून एक, हॉटेल स्कायलार्क येथून १०, कोविड केअर सेंटर हेंडज मुर्तिजापूर येथून एक अशा एकूण ४४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.८१२ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्हजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ७,७१३ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ६६५३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २४८ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ८१२ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला