अकोला : गत काही महिन्यांपासून जिल्ह्यात धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना संसर्गाचा वेग कमी झाला आहे. रविवार, ११ आॅक्टाबर रोजी आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये १३ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ७८०८ झाली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून रविवारी सकाळी आरटीपीसीआर चाचण्यांचे १२६ अहवाल प्राप्त झाले. यापैकी १३ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ११३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह निदान झालेल्या रुग्णांमध्ये पैलवाडा येथील दोन जणांसह निंबा, भीम नगर, गजानन नगर, खडकी, केशव नगर, किसरा कॉलनी, बाळापूर, वाल्मिकी नगर, बाळापूर नाका, कापसी ता. पातूर व जीएमसी क्वॉर्टर येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे.५८४ अॅक्टिव्ह पॉझिटिव्हजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ७,८०८ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ६,९७० रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २५४ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ५८४ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.
CoronaVirus : अकोला जिल्ह्यात आणखी १३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2020 12:08 PM