अकोला : शहरी भागासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात आजपर्यंत २० हजार १०१ जणांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, त्यांना होम क्वारंटीन करण्यात आले होते. त्यापैकी आतापर्यंत १९ हजार ४३० जणांनी ‘होम क्वारंटीन’चा कार्यकाळ पूर्ण केला आहे, तर ६७१ जण अद्यापही अलगीकरणात आहेत.जिल्ह्यातील हजारो तरुण नोकरी, शिक्षण किंवा व्यवसायासाठी पुणे, मुंबईसह इतर महानगरात गेले आहेत. यातील काही लोक विदेशातही वास्तव्यास आहेत; पण कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ते जिल्ह्यात परतले आहेत. आतापर्यंत बाहेर जिल्ह्यातून किंवा विदेशातून परतलेल्या तब्बल २० हजार १०१ प्रवासी नागरिकांची नोंद करण्यात आली आहे. गावात येताच आरोग्य विभागातर्फे त्यांची प्राथमिक वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. या सर्वांनाच होम क्वारंटीन करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. शिवाय ज्यांना कोरोनाची लक्षणे आढळून आलीत, किंवा जे लोक कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आले, अशांना उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात दाखल करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील त्या सर्वच प्रवासी नागरिकांना होम क्वारंटीन करण्यात आले होते. त्यातील १९ हजार ४३० लोकांनी होम क्वारंटीनचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. या सर्वांवर आरोग्य विभागाचे विशेष लक्ष असून, त्यापैकी कोणाला कोरोनाची लक्षण आढळताच, त्यांना अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले जात आहे.
CoronaVirus : ग्रामीण भागातील १९ हजार जण ‘होम क्वारंटीन’ मुक्त!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2020 6:11 PM
आतापर्यंत १९ हजार ४३० जणांनी ‘होम क्वारंटीन’चा कार्यकाळ पूर्ण केला आहे.
ठळक मुद्दे२० हजार १०१ प्रवासी नागरिकांची नोंद करण्यात आली आहे. आरोग्य विभागातर्फे त्यांची प्राथमिक वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. त्यातील १९ हजार ४३० लोकांनी होम क्वारंटीनचा कार्यकाळ पूर्ण केला आहे.