शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मला गोळ्या झाडा मी मरणार नाही, तुम्हाला सोडणार"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
3
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
4
“देवेंद्र फडणवीस यांची ही ‘लाडका विनोद’ योजना आहे का?”; काँग्रेसची खोचक टीका
5
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
6
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
7
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
8
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; आरोपीने सांगितलं नाव, कोण होता मास्टरमाइंड?
9
आदित्य ठाकरेंविरोधात भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार; आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप
10
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
11
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
12
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
13
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
14
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
15
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
16
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
17
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
18
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
19
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
20
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप

CoronaVirus : अकोल्यात आणखी २२ रुग्ण वाढले; एकूण आकडा ६२७ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2020 11:13 AM

मंगळवार,२ जून रोजी आणखी २२ रुग्णांची भर पडत एकूण बाधित रुग्णांची संख्या ६२७ झाली आहे.

ठळक मुद्देमंगळवारी सकाळी ४८ अहवाल प्राप्त झाले. २२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित २६ अहवाल निगेटिव्ह आहेत.आज सकाळी प्राप्त अहवालात १२ महिला व १० पुरुष पॉझिटीव्ह आढळले आहेत

 अकोला : अकोल्यात कोरोना संसर्गाचा विळखा आणखीनच घट्ट होत असून, दररोज मोठ्या संख्येने रुग्ण आढळून येत आहेत. मंगळवार,२ जून रोजी आणखी २२ रुग्णांची भर पडत एकूण बाधित रुग्णांची संख्या ६२७ झाली आहे. यापैकी ४४२ रुग्ण बरे झाल्याने सद्यस्थितीत १५१ रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने मंगळवारी सकाळी दिली.  अकोला जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत असून, रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे अकोला जिल्हा सध्या कोरोनाचा विदर्भातील ‘हॉटस्पॉट’ ठरला आहे. सोमवार, १जूनपर्यंत कोरोनाबाधितांची संख्या ६०५  होती. यामध्ये मंगळवारी आणखी २२ रुग्णांची भर पडून हा आकडा ६२८  वर गेला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल लॅब’कडून मंगळवारी  सकाळी   ४८ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित २६ अहवाल निगेटिव्ह आहेत. आज सकाळी प्राप्त अहवालात १२ महिला व १० पुरुष पॉझिटीव्ह आढळले आहेत. दोन महिला रुग्ण ह्या जिल्हा स्त्री रुग्णालयातून संदर्भित आहेत. हे रुग्ण  रजपुतपुरा येथील तीन,  सिंधी कॅम्प येथिल दोन, माळीपुरा येथील दोन,  अशोकनगर अकोट फैल येथील दोन  तर उर्वरीत तारफैल, सिटी कोतवाली, जठारपेठ,  आंबेडकरनगर,  शिवसेना वसाहत,  जुने तारफैल,  आदर्श कॉलनी, गुलशन कॉलनी,  रुद्रनगर, जुनी उमरी नाका,  खदान,  पुरानी मशिद आणि अलिम चौक खदान येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. अकोला शहर हे प्रामुख्याने कोरोनाचे केंद्र बिंदू ठरले असून, शहरात १०० पेक्षाही अधिक कन्टेनमेन्ट क्षेत्र आहेत. जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्याही ३४ वर गेली आहे. यामध्ये एका कोरोनाबाधिताने आत्महत्या केलेली आहे. आतापर्यंत ४४२ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यापैकी बहुतांश जण घरी गेले आहेत. तर काही जणांना संस्थागत अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. आता १५१ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 

प्राप्त अहवाल-४८पॉझिटीव्ह-२२निगेटीव्ह-२६

 

आता सद्यस्थिती

  1. एकूण पॉझिटिव्ह अहवाल-६२७
  2. मयत-३४(३३+१),डिस्चार्ज-४४२
  3. दाखल रुग्ण (अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह)-१५१ 
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला