अकोला: अकोल्यात कोरोना संसर्गाचा वेग काही केल्या कमी होण्याची चिन्हे नसून, दररोज मोठ्या संख्येने पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. शनिवार, २० जून रोजी यामध्ये आणखी २५ रुग्णांची भर पडल्याने एकूण बाधित रुग्णांचा आकडा ११६१ झाला आहे. तर अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३६० वर गेली आहे.विदर्भातील कोरोनाचा हॉटस्पॉट अशी कुप्रसिद्धी झालेल्या अकोल्यात मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रुग्णआढळून येत असून, कोरोनाच्या बळींचा आकडाही दिवसागणिक वाढतच आहे. शुक्रवारपर्यंत जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ११३६ होती. शनिवारी यामध्ये २५ रुग्णांची भर पडत हा आकडा ११६१ झाला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी सकाळी एकून २३८ चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी २५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. तर २१३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत.पॉझिटिव्ह २५ अहवालात नऊ महिला व १६ पुरुषांचा समावेश आहे. त्यात आदर्श कॉलनी येथील चार, शंकर नगर, अशोक नगर, न्यु साई नगर, जूने शहर येथील प्रत्येकी दोन, तर रामदास पेठ, अकोट फैल, बोरगांव मंजू, मूकूंद वाडी, हरिहर पेठ, हैदरपूरा, कच्ची खोली, खदान, शास्री नगर, गायत्री नगर, सोनटक्के प्लॉट, सिंधी कॅम्प व बुलडाणा येथील प्रत्येकी एकाचा समावेश असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.प्राप्त अहवाल- २३८पॉझिटीव्ह- २५निगेटीव्ह-२१३आता सद्यस्थितीएकूण पॉझिटिव्ह अहवाल- ११६१मयत-५९(५८+१), डिस्चार्ज-७४२दाखल रुग्ण (अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह)- ३६०
CoronaVirus : अकोल्यात आणखी २५ रुग्ण वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 12:43 PM
शनिवार, २० जून रोजी यामध्ये आणखी २५ रुग्णांची भर पडल्याने एकूण बाधित रुग्णांचा आकडा ११६१ झाला आहे.
ठळक मुद्देशनिवारी सकाळी एकून २३८ चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी २५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३६० वर गेली आहे.