अकोला : कोरोनाचा विदर्भातील हॉटस्पॉट ठरलेल्या अकोला शहरात संसर्गाचा वेग कायम असून, बुधवार, २७ मे रोजी आणखी ३० रुण वाढले. एकट्या हरीहर पेठ भागातील १३ रुग्णांसह एकूण ३० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण रुग्ण संख्या ४६५ झाली आहे. जिल्ह्यातील मृतकांची संख्याही २८ झाली असून, आतापर्यंत २८९ रुग्ण बरे झाल्यामुळे सद्या १४८ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल प्रयोगशाळेकडून बुधवारी सकाळी १८३ संदिग्ध रुग्णांचे वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले आहे. यापैकी ३० जण पॉझिटिव्ह असून, १५३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आज सकाळी पॉझिटीव्ह आलेल्या अहवालात १० महिला तर २० पुरुष रुग्ण आहेत. त्यातील १३ जण हे एकट्या हरिहर पेठ भागातील रहिवासी आहेत. मोहता मिल प्लॉट नाजुकनगर, मोठी उमरी, गुलजार पुरा येथील प्रत्येकी दोन जण, तर खैर मोहम्मद प्लॉट, राहुलनगर शिवनी, तेलीपुरा, लेबर कॉलनी तारफैल, सहकार नगर, डाबकी रोड, वृंदावन नगर, देशमुख फैल, चांदखा प्लॉट वाशिम बायपास, फिरदौस कॉलनी, रणपिसे नगर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.आता सद्यस्थितीएकूण पॉझिटिव्ह अहवाल- ४६५मयत-२८(२७+१),डिस्चार्ज- २८९दाखल रुग्ण (अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह)- १४८प्राप्त अहवाल-१८३पॉझिटीव्ह-३०निगेटीव्ह-१५३
CoronaVirus : अकोल्यात आणखी ३० रुग्ण वाढले; एकूण आकडा ४६५
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 12:41 PM
एकूण ३० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण रुग्ण संख्या ४६५ झाली आहे.
ठळक मुद्देएकट्या हरीहर पेठ भागातील १३ रुग्ण. सद्या १४८ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु.बुधवारी सकाळी १८३ संदिग्ध रुग्णांचे वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले.