अकोला : अकोल्यात कोरोनाचा धुमाकूळ सुरुच असून, या संसर्गजन्य आजाराची लागण होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. शनिवार, २७ जून रोजी ४२ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या १४०६ झाली आहे. आतापर्यंत एकूण १०४७ जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे सद्यस्थितीत २८५ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.विदर्भातील कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या अकोल्यात दररोज मोठ्या संख्येने पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी सकाळी २३० संदिग्ध रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी ४२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. तर उर्वरित १८८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. आज सकाळी प्राप्त अहवालात १९ महिला व २३ पुरुष रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये हरिहरपेठ येथील सहा, अकोट फैल येथील पाच, समर्थनगर पातूर येथील चार, न्यू राधाकिसन प्लॉट, सिंधी कॅम्प, आंबेडकर नगर येथील प्रत्येकी तीन, डाबकी रोड येथील दोन, तर आदर्श कॉलनी, सोनटक्के प्लॉट, बाळापूर रोड, कौलखेड, गंगानगर, गीतानगर, शिवर, शिवसेना वसाहत, गुलजारपुरा, कमलानगर, पोळा चौक, बार्शीटाकळी, मुर्तिजापूर, बोरगाव मंजू, अकोट व मंगळूरपीर जि. वाशीम येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ७४ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एका कोरोनाबाधिताच्या आत्महत्येचा समावेश आहे.प्राप्त अहवाल-२३०पॉझिटीव्ह अहवाल-४२निगेटीव्ह-१८८
आता सद्यस्थितीएकूण पॉझिटीव्ह अहवाल- १४०६मयत-७४ (७३+१)डिस्चार्ज- १०४७दाखल रुग्ण (अॅक्टीव्ह पॉझिटीव्ह)-२८५