अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, या जीवघेण्या आजाराचा संसर्ग होणाऱ्यांची संख्या दिवसेंंदिवस वाढतच आहे. मंगळवार, २५ आॅगस्ट रोजी आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ९ जण पॉझिटिव्ह आढळून आले. यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ३ ,५५३ वर गेली आहे. दरम्यान, आतापर्यंत ३०२२ जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे सद्यस्थितीत ३८७ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.नागपूर व अमरावतीनंतर सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण अकोला जिल्ह्यात आढळून येत आहेत.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून मंगळवारी आरटीपीसीआर’ चाचणीचे ६० अहवाल प्राप्त झाले. यापैकी नऊ जण पॉझिटिव्ह असून, ५१ जणांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. आज सकाळी नऊ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यामध्ये चार महिला व पाच पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये आदर्श कॉलनी व रायखेड ता. तेल्हारा येथील प्रत्येकी तीन जणांसह रतनलाल प्लॉट, अडगाव ता. तेल्हारा व खडकी येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
३८७ जणांवर उपचार सुरुजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३५५३ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ३०२२ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १४४ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ३८७ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.