शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
2
सपाला मतदान करण्यास विरोध केला म्हणून तरुणीची हत्या; मैनपुरी हादरली, बलात्काराचाही संशय
3
PM नरेंद्र मोदींचा जगात डंका; आता गयाना आणि बार्बाडोसकडून 'सर्वोच्च सन्मान' जाहीर!
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "तुझा मर्डर फिक्स", सुहास कांदेंची समीर भुजबळांना जीवे मारण्याची धमकी; दोन्ही गटात जोरदार वादावादी
5
'धारावी प्रोजेक्ट'मध्ये अदानींना इंटरेस्टच नव्हता; शरद पवारांनी विषयच निकाली काढला
6
Lawrence Bishnoi : "लॉरेन्स बिश्नोई रोज सकाळी १०८ वेळा..."; वकिलाने सांगितल्या गँगस्टरच्या काही खास गोष्टी
7
"पक्षापेक्षा जास्त उमेदवाराचा विचार!" मनवा नाईकने केलं मतदान, म्हणाली, "स्थिर सरकार..."
8
तुम्हाला माहितीये का, भारतात रस्त्यावर धावणाऱ्या सर्वाधिक ई-बसेस कोणत्या कंपनीच्या?
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : निवडणुकीदिवशीच सोलापुरात ठाकरे गटाला धक्का! सुशीलकुमार शिंदेंचा अपक्ष उमेदवाराला पाठिंबा
10
६ महिन्यांत 'या' शेअरमध्ये ५६५% ची वाढ; आता बोनस शेअर देण्याची तयारी, कोणता आहे स्टॉक?
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार
12
Vidhan Sabha 2024: महिला उमेदवारांचे त्रिशतक; आतापर्यंतचा उच्चांक!  
13
RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल; रिझर्व्ह बँकेनं नागरिकांना केलं सावध, म्हणाले...
14
शिंदेंच्या शिवसेनेकडून बनावट पत्र, राज ठाकरे संतापले; "वरळीकर मतदार सूज्ञ..." 
15
चंदा कोचर यांच्याविरोधात कारवाई करू नका, उच्च न्यायालयाचे एसएफआयओला निर्देश 
16
Sharad Pawar: सुप्रिया सुळेंवर मतदानाच्या आदल्या दिवशी गंभीर आरोप; शरद पवारांनी एका वाक्यात विषय संपवला!
17
विधानसभा निवडणुकीत 'आप' कोणाला तिकीट देणार? अरविंद केजरीवालांकडून मोठा खुलासा
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
19
Jio New Recharge: केवळ इतक्या रुपयांमध्ये मिळणार वर्षभरासाठी अनलिमिटेड 5G डेटा; पाहा डिटेल्स
20
सदा सरवणकरांच्या कोटवर दिसला उलटा 'धनुष्यबाण'; मनसेच्या अमित ठाकरेंनी केला सरळ

CoronaVirus in Akola : दिवसभरात १ मृत्यू; ३३ पॉझिटिव्ह; एकूण रुग्ण ३४१ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 6:17 PM

गुरुवार, २१ मे रोजी यामध्ये दिवसभरात तब्बल ३३ पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे.

ठळक मुद्देअकोट फैल येथील ६८ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.सकाळी १६ तर सायंकाळी १७ अशा ३३ नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली.सद्यस्थितीत १२९ रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

अकोला: अकोल्यात कोरोनाच्या संक्रमणाने घेतलेला सुसाट वेग कमी होण्याची कोणतीही चिन्हे नसून, अख्खे शहरच या विषाणूने कवेत घेतले आहे. कोरोनाबाधीतांच्या संख्येन बुधवारी ३०० चा टप्पा ओलांडल्यानंतर गुरुवार, २१ मे रोजी यामध्ये दिवसभरात तब्बल ३३ पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. तर बुधवारी भीमचौक अकोट फैल येथील ६८ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा ३४१ वर पोहचला आहे. तर मृतकांचा आकडाही २१ झाल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.विदर्भात नागपूरनंतर अकोला शहर हे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहे. शहर व जिल्हा मिळून बुधवार २० मे रोजी ३०० चा टप्पा ओलांडत बाधितांची संख्या ३०८ झाली. यामध्ये गुरुवारी सकाळी १६ तर सायंकाळी १७ अशा ३३ नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून दिवसभरात प्राप्त १७३ अहवालांपैकी ३३ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तर उर्वरित १४० अहवाल निगेटिव्ह आहेत. यामध्ये १९ पुरुष व १४ महिलांचा समावेश आहे. गुरुवारी सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये रेल्वे कॉलनी जठारपेठ येथील तीन जण, फिरदौस कॉलनी येथील दोन, डाबकी रोड येथील दोन, नायगाव येथील दोन, तर रजपूतपुरा, ज्योतीनगर सिव्हिल लाईन्स, न्यू राधाकिसन प्लॉट, गोरक्षण रोड, सोनटक्के प्लॉट, पुरपिडीत कॉलनी अकोट फैल, लक्ष्मीनगर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. तर सायंकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या १७ जणांमध्ये सोनटक्के प्लॉट जुने शहर येथील तीन जण, जोगळेकर प्लॉट डाबकीरोड येथील चार जण, तर रेवतीनगर बाळापुरनाका डाबकीरोड, देशमुख फैल, डाबकीरोड, अकोट फैल, सावंतवाडी, सिव्हील लाईन्स, जुने शहर, लकडगंज रामदास पेठ, मोमीनपुरा, आंबेडकर नगर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. आतापर्यंत २१ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी एकाने आत्महत्या केल्याची नोंद आहे. तर १९१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत १२९ रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.आता सद्यस्थितीएकूण पॉझिटिव्ह अहवाल-३४१मयत-२१(२०+१),डिस्चार्ज-१९१दाखल रुग्ण (अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह)-१२९

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला