अकोला : कोरोनाचा विदर्भातील हॉटस्पॉट अशी ओळख निर्माण झालेल्या अकोला जिल्ह्यात दिवसागणिक पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. शुक्रवार, ११ जुलै रोजी जिल्हाभरात आणखी १० पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या १८५९ वर गेली असून, सद्यस्थितीत ३१८ जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी सकाळी २७९ जणांचे वैद्यकीय चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी १० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. तर उर्वरित २६९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. यामध्ये दोन महिला व आठ पुरुष आहेत. यापैकी सहा जण अकोट येथील, दोन जण बाळापूर येथील, तर उर्वरित खडकी-अकोला व बोरगाव मंजू येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.३१८ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरुआजपर्यंत एकूण १८५९ (१८३८+२१) पॉझिटीव्ह अहवालांची संख्या आहे. त्यातील ९१ जण (एक आत्महत्या व ९० कोरोनामुळे) मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या १४५० आहे. तर सद्यस्थितीत ३१८ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.