लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गत सहा महिन्यात जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढला. यामध्ये ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागातील रुग्णसंख्या ११.९ टक्क्यांनी जास्त असल्याची माहिती समोर आली आहे. शहरी भागात ५५.९५, तर ग्रामीण भागात ४४.५ टक्के पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेत.जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आलेख वाढतच आहे. वाढत्या रुग्णसंख्येवर अंकुश लावण्यासाठी आरोग्य विभागातर्फे चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली. शहरी भागासह ग्रामीण भागातही वैद्यकीय शिबिर राबवून संदिग्ध रुग्णांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये प्रामुख्याने आरटीपीसीआर, रॅपिड अॅन्टिजन टेस्ट आणि ट्रू नेट आदी प्रकारच्या चाचण्या करण्यात आल्यात. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५९,१५६ नमुन्यांच्या चाचण्या करण्यात आल्यात. यामध्ये शहरी भागातील ३०,३७०, तर ग्रामीण भागातील २८,७८६ चाचण्यांचा समावेश आहे. यापैकी ४,२३५ शहरी तर ३,३३४ पॉझिटिव्ह अहवाल ग्रामीण भागातील आहेत. म्हणजेच ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात कोरोनाचा जास्त प्रवाह दिसून आला. त्यामुळे ग्रामीण भागासह शहरी भागातील नागरिकांनी वेळीच खबरदारी घेण्याची गरज आहे.
CoronaVirus in Akola ग्रामीणच्या तुलनेत शहरात ११ टक्के रुग्ण जास्त!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2020 10:22 AM