अकोला : कोरोनाच्या पृष्ठभूमीवर आतापर्यंत जिल्ह्यातील १९१ संदिग्ध रुग्णांना सर्वोपचार रुग्णालयातील ‘आयसोलेशन’ कक्षात दाखल करण्यात आले होते. एकूण १८७ पैकी १६१ अहवाल प्राप्त आहेत. त्यापैकी १४८ जणांचे वैद्यकीय चाचणी अहवाल ‘निगेटिव्ह’, तर १३ जण ‘पॉझिटिव्ह’ आहेत. २६ जणांचे अहवाल अद्यापही प्रलंबित आहेत. शनिवारी आणखी ३ संदिग्ध रुग्ण ‘आयसोलेशन’ कक्षात दाखल झाले. सर्वोपचार रुग्णालयात सध्या कोरोनाचे १०३ संदिग्ध रुग्ण दाखल आहेत. त्यापैकी २८ ‘आयसोलेशन’मध्ये, तर ७५ इतर वॉर्डात दाखल आहेत. शिवाय, संदिग्ध म्हणून दाखल झालेल्या ८२ जणांना आजपर्यंत सुटी देण्यात आली आहे. कोरोना समुपदेशन कक्षात शनिवारी ६४ जणांची तपासणी करण्यात आली.
कोरोना संशयित नमुने तपासणी अहवालानुसार प्राप्त अहवाल-२४(चोवीस)निगेटिव्ह-२४(चोवीस)पॉझिटिव्ह-शून्यआतापर्यँतएकूण १८७ पैकी १६१ अहवाल प्राप्तनिगेटिव्ह-१४८पॉझिटिव्ह-१३