अकोला : कोरोना संसर्गाचा वेग कमी होण्याची कोणतीही चिन्हे नसून, रुग्णांची संख्या दररोज झपाट्याने वाढत आहे. शुक्रवार, ५ जून रोजी आणखी १४ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ७२६ वर पोहचली आहे. यापैकी ४८८ रुग्ण बरे झाल्याने सद्यस्थितीत २०४ रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी दिली. अकोला जिल्हा सध्या कोरोनाचा विदभार्तील हॉटस्पॉट ठरला आहे. गुरुवार, ४ जूनपर्यंत कोरोनाबाधितांची संख्या ७१२ होती. यामध्ये शुक्रवारी आणखी १४ रुग्णांची भर पडून हा आकडा ७२६ वर गेला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शुक्रवारी सकाळी एकूण २८ अहवाल प्राप्त झाले. यापैकी १४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १४ अहवाल निगेटिव्ह आहेत.आज सकाळी प्राप्त अहवालात सात महिला व सात पुरुष पॉझिटीव्ह आढळले आहेत. यापैकी दोन जण गुलजारपुरा, दोन सिंधी कॅम्प, दोन जण हैदरपुरा, तर उर्वरित गोरक्षण, गवळीपूरा, पातूर, बिर्ला कॉलनी, अकोट फैल, बैदपुरा, जुने शहर, मोहतामिल येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या ३४ वर गेली आहे. यामध्ये एका कोरोनाबाधिताने आत्महत्या केलेली आहे. आतापर्यंत ४८८ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आता २०४ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.आता सद्यस्थितीएकूण पॉझिटिव्ह अहवाल-७२६मयत-३४(३३+१),डिस्चार्ज-४८८दाखल रुग्ण (अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह)-२०४
CoronaVirus in Akola : आणखी १४ रुग्ण वाढले; एकूण आकडा ७२६ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2020 11:15 AM
आणखी १४ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ७२६ वर पोहचली आहे.
ठळक मुद्दे शुक्रवारी सकाळी एकूण २८ अहवाल प्राप्त झाले. यापैकी १४ पॉझिटिव्ह असून, उर्वरित १४ अहवाल निगेटिव्ह आहेत. सात महिला व सात पुरुष पॉझिटीव्ह आढळले आहेत.