शहरं
Join us  
Trending Stories
1
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
2
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
3
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...
4
भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
5
"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाचा मविआला इशारा 
6
मृत्यू केव्हा गाठणार? एका रिपोर्टवर AI टूल करते भविष्यवाणी; लोकांच्या हॉस्पिटलमध्ये लागल्यात रांगा
7
जबरदस्त! Whatsapp मध्ये येणार कमाल फीचर; मोबाईल न वापरता मॅनेज करू शकता कॉन्टॅक्ट्स
8
Maharashtra Assembly Election: दिंडोशीत सुनील प्रभूंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण?
9
हॉकीच्या 'राणी'ला निरोप! "देशातील प्रत्येक मुलीचा आत्मविश्वास वाढवला", IAS अधिकारी भारावली
10
Maharashtra Assembly election 2024: अंधेरी पूर्वची जागा शिंदेंच्या शिवसेनेला की, भाजपला?
11
"वर्षभर वेळ मागितला, तरी दिला नाही; मातोश्रीवर गेलो तिथे ६ तास थांबवलं अन् २ मिनिटे भेटले"
12
अभिनेता पृथ्वीक प्रतापने साधेपणाने लग्न का केलं? कारण वाचून तुम्हीलाही वाटेल हेवा!
13
भारत-चीन सैन्य मागे घेण्यास सुरुवात; येत्या तीन दिवसांत टेंट, शेड अन् इमारती हटवल्या जाणार
14
पतीसह पिकनिकला गेलेल्या महिलेवर सामूहिक बलात्कार, व्हिडीओही बनवले, गुन्हा नोंदवण्यासाठी पीडितांची वणवण
15
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील शूटरला देश सोडण्यासाठी पासपोर्ट देण्याचं दिलेलं आश्वासन
16
आदित्य ठाकरेंकडे ५३५ हिरे लगडलेले कडे, दीड किलो सोने...; प्रतिज्ञापत्रात उद्धव ठाकरेंचेही उत्पन्न केले जाहीर
17
विधानसभा निवडणुकीत महायुतीचा स्ट्राइकरेट कसा असेल? मुख्यमंत्री शिंदे यांनी एका वाक्यात सांगितलं 
18
Maharashtra Assembly Election 2024: दिनकर पाटलांमुळे भाजपला फटका? नाशिकमध्ये समीकरण बदललं!
19
"राहुल गांधींच्या विधानाची मोडतोड करून फेक नरेटिव्ह पसरवण्याचा भाजपाचा प्रयत्न’’, नाना पटोले यांचा आरोप

CoronaVirus in Akola : दिवसभरात १५ पॉझिटिव्ह; कोरोनाबाधितांची संख्या ५५ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2020 6:24 PM

रविवार, ३ मे रोजी दिवसभरात कोरोना विषाणूने बाधीत झालेले आणखी १५ नवे रुग्ण समोर आले.

अकोला : आतापर्यंत संसर्गाची गती मंद असलेल्या कोरोना विषाणूने गत पाच दिवसांंत वेग पकडला असून, शहरातील विविध भागात हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. रविवार, ३ मे रोजी  दिवसभरात कोरोना विषाणूने बाधीत झालेले आणखी १५ नवे रुग्ण समोर आले. सकाळी १२ जणांचे, तर सायंकाळी ३ जणांचे असे दिवसभरात एकून १५ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सायंकाळी सांगण्यात आले.  सायंकाळी प्राप्त तिन्ही पॉझिटिव्ह अहवाल हे महिलांचे असून, यापैकी दोन बैदपुरा तर एक न्यू भीम नगर भागातील आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधीतांची संख्या ५५ झाली असून, सद्यस्थितीत ३५ रुग्णांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालया उपचार सुरु आहेत. 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार,आजअखेर एकूण ८८५ नमुने पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी ७९२ अहवाल आले आहेत. आजअखेर एकूण ७३७ अहवाल निगेटीव्ह तर ५५ अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाले आहेत व  ९३ अहवाल प्रलंबित आहेत.आजपर्यंत एकूण ८८५ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ७१४, फेरतपासणीचे ९४ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ७७ नमुने होते. आजपर्यंत एकूण ७९२ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ६२१ तर फेरतपासणीचे ९४ व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ७७ अहवाल आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ७३७ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल ५५ आहेत. तर आज अखेर ९३ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत.आज प्राप्त झालेल्या ६३ अहवालात ४८ अहवाल निगेटीव्ह आले आहेत तर १५ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.आता सद्यस्थितीत  ५५ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यातील सात जण मयत आहेत.  तर गुरुवारी (दि.२३एप्रिल) सात जण व सोमवारी (दि.२७एप्रिल) एका जणास, गुरुवारी (दि.३० एप्रिल) तिघांना आणि आज (रविवार दि.३ मे) दोघांना  असे १३ जणांना घरी सोडण्यात आले आहे. तर सद्यस्थितीत ३५ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.दरम्यान   आज  पॉझिटीव्ह अहवाल आलेल्या दोघा महिलांचे निधन दि.१ व दि. २ रोजी झाले होते. त्यांचे अहवाल आज प्राप्त झाले, त्या बैदपुरा व सिटी कोतवाली परिसरातील रहिवासी होत्या, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून देण्यात आली.

एकाच दिवशी १५पॉझिटीव्हआज सकाळी साडेनऊ वाजता अहवाल प्राप्त झाले तेव्हा १२ जण तर सायंकाळी सहा वाजता प्राप्त अहवालात तिघे जण,  असे दिवसभरात १५ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आज सकाळी पॉझिटिव्ह आढळलेल्या  १२ रुग्णांपैकी दोन महिला या दि.१ व दि.२ रोजी मयत झाल्या. तर उर्वरीत दहा जणांपैकी तिघे मोमीनपुरा, पाच जण बैदपुरा तर दोघे जण न्यू भीमनगर येथील रहिवासी आहेत. तर सायंकाळी प्राप्त अहवालात तिघे पॉझिटीव्ह रुग्ण असून त्या तिनही महिला आहेत. त्यात एक महिला ही न्यू भिमनगर येथील तर अन्य दोन्ही महिला या  बैदपूरा येथील रहिवासी आहेत.

दोघांना डिस्चार्जदरम्यान,आज बैदपुरा येथील दोघांना  पुर्ण बरे झाल्यानंतर डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आले. ही दोघे भावंडे असून  या आधीच्या एका मयत रुग्णाची अपत्ये आहेत. त्यांना आज रुग्णालयातील आरोग्य कर्मचारी व त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर्सने टाळ्या वाजवून निरोप दिला.

८५६ प्रवासी आले

दरम्यान आजअखेर ८५६ प्रवासी आले आहेत. त्यापैकी ३२४ गृहअलगीकरणात व १६६ संस्थागत अलगीकरणात असे ४९० जण अलगीकरणात आहेत. तर २४६ जणांचा अलगीकरणाचा १४ दिवसांचा कालावधी  पूर्ण झाला आहे.  तर १२० रुग्ण हे विलगीकरण कक्षात आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या