अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, रोज मृत्यूचे सत्र सुरू आहे. सोमवारी त्यात आणखी १६ मृत्यूची भर पडली असून ३७१ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना सोमवारी ७३७ रुग्णांनी कोरोनावर मात केली. अकाेलेकरांसाठी ही बातमी काहीसा दिलासा देणारी असली, तरी मृत्यूची वाढती संख्या चिंताजनक आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे. सोमवारी प्राप्त अहवालानुसार, १६ मृतकांमध्ये बार्शीटाकळी येथील ६० वर्षीय महिलेसह मूर्तिजापूर तालुक्यातील दहातोंडा येथील ६० वर्षीय पुरुष, रामदासपेठ येथील ६४ वर्षीय पुरुष, बार्शिटाकळी तालुक्यातील किनखेड येथील ५० वर्षीय पुरुष, मो. अलीरोड सिटी कोतवाली येथील ६१ वर्षीय पुरुष, डाबकी रोड येथील ३९ वर्षीय पुरुष, खदान येथील ३५ वर्षीय पुरुष, अकोट तालुक्याती देवरी येथील ५५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच खदान येथील ३५ वर्षीय पुरुष, आंबेडकरनगर येथील ६४ वर्षीय पुरुष, चिखलगाव येथील ८५ वर्षीय पुरुष, मोठी उमरी येथील ७० वर्षीय पुरुष, बाळापूर तालुक्यातील व्याळा येथील ६५ वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे. यासह खासगी रुग्णालयात तिघांचे मृत्यू झाले. यामध्ये बार्शिटाकळी तालुक्यातील जनूना येथील ७६ वर्षीय पुरुष, सिंधी कॅम्प येथील ६५ वर्षीय पुरुष, गोरक्षण रोड येथील ६५ वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे. वाढत्या मृत्यूच्या संख्येसोबतच सोमवारी ३७१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यामध्ये रॅपिड चाचणीतील १०७, तर आरटीपीसीआरचे २६४ अहवालांचा समावेश आहे. सोमवारी ७३७ रुग्णांनी कोरोनावर मात केली. पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडा मोठा असल्याने अकोलेकरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला.
तालुकानिहाय रुग्णसंख्या
तालुका - रुग्णसंख्या
मूर्तिजापूर -१६
अकोट -१२
बाळापूर -३२
तेल्हारा -१९
बार्शिटाकळी -०२
पातूर -५५
अकोला -१२८ (ग्रामीण-२५, मनपा -१०३)
५,६१५ रुग्णांवर उपचार सुरू
सद्य:स्थितीत जिल्ह्यात ५ हजार ६१५ रुग्णांवर उपचार सुरू असून, यातील बहुतांश रुग्ण गृहविलगीकरणात आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ३८ हजार ४३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून, त्यापैकी ६४५ जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत ३१ हजार ७८३ जणांना डिस्चार्ज देण्यात आली आहे.