अकोला : अकोल्याला बसलेला कोरोनाचा विळखा अधिकच घट्ट होत असून, दररोज मोठ्या संख्येने पॉझिटिव्ह रुग्ण समोर येत आहेत. सोमवार, २९ जून रोजी आणखी २२ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १५३२ झाली आहे.विदर्भातील कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या अकोल्यात दररोज मोठ्या संख्येने पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून सोमवारी २६३ संदिग्ध रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी २२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. तर उर्वरित २४१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. आज सकाळी प्राप्त २२ पॉझिटीव्ह अहवालात १० महिला व १२ पुरुष आहेत. यामध्ये चार जण गजानन नगर अकोला, चार जण कळंबेश्वर येथील, तीन जण गाडगेनगर, दोन जण हरिहर पेठ, दोन जण सिंधी कॅम्प, तर दगडी पुल, अकोट फैल, अयोध्यानगर, डाबकीरोड, आदर्श कॉलनी, कामा प्लॉट व विठ्ठल मंदिर येथील प्रत्येकी एकाचा समावेश असल्याचे जिल्हा रुग्णालयाकडून सांगण्यात आले.३८० रुग्णांवर उपचार सुरुजिल्ह्यात आतापर्यंत १०७५ रुग्ण कोरोनातुन बरे झाल्यमुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंत एकूण ७७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत ३८० कोरोनाग्रस्त रुग्णांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.प्राप्त अहवाल-२६३पॉझिटीव्ह अहवाल-२२निगेटीव्ह-२४१ आता सद्यस्थिती एकूण पॉझिटीव्ह अहवाल- १५३२मयत-७७ (७६+१)डिस्चार्ज-१०७५दाखल रुग्ण (अॅक्टीव्ह पॉझिटीव्ह)-३८०