अकोला : अकोल्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, संक्रमित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. शनिवार, २३ मे रोजी दिवसभरात २३ पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडत एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३७८ वर गेली आहे. दरम्यान, शुक्रवारी रात्री पाच जणांना, तर शनिवारी आणखी ८ अशा एकूण १३ जणांना रुग्णालयातून डिस्जार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत १३६ रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच मात्र कोरोनाचा प्रादूर्भाव झपाट्याने होत असून, दिवसागणिक दुहेरी आकड्याने रुग्णसंख्या वाढत आहे. शुक्रवारपर्यंत जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३५५ होती. यामध्ये शनिवारी आणखी २३ जणांची भर पडत हा आकडा ३७८ वर पोहचला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल प्रयोगशाळेकडून शनिवारी दिवसभरात १५३ संदिग्ध रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले असून, त्यापैकी २३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह, तर उर्वरित १३० जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये १५ महिला, तर आठ पुरुषाचा समावेश आहे. सकाळी पॉझिटीव्ह आढळून आलेल्या रुग्णांपैकी पाच रुग्ण हे एकट्या फिरदौस कॉलनी भागातील आहेत. तर उर्वरित दोघे हे अनुक्रमणे मानिक टॉकीज जवळ-टिळकरोड व खोलेश्वर भागातील लोहिया नगर येथील रहिवासी आहेत. तर सायंकाळी पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रुग्णांमध्ये दोघे फिरदोस कॉलनी, दोन जण लोहिया नगर खोलेश्वर येथील रहिवासी आहे. तर उर्वरित माळीपुरा, मोहम्मद अली रोड, नानकनगर निमवाडी, चांदखा प्लॉट वाशीम बायपास, गोरक्षण रोड मलकापूर, यमुना संकुल, श्रावगी प्लॉट, हरिहर पेठ, इकबाल कॉलनी मोहता मिल जवळ, मलकापूर, रेल्वे झोन रामदास पेठ, दसेरा नगर हरिहर पेठ येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.जिल्ह्यात आतापर्यंत २३ कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यापैकी २२ जणांचा मृत्यू कोविड-१९ आजारामुळे झाला आहे. तर बाळापूर येथील एका कोरोनाबाधिताने आत्महत्या केली आहे. आतापर्यंत तब्बल २१९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत १३६ पॉझिटिव्ह रुग्णांवर आयसोलेशन कक्षात उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.आणखी १३ जणांना डिस्चार्जशुक्रवार व शनिवारी एकूण १३ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. शुक्रवारी खैर मोहम्मद प्लॉट येथील दोघे, फिरदोस कॉलनी, आगर वेस व अकोट फैल येथील प्रत्येकी एक अशा पाच जणांना सुटी देण्यात आली. शनिवारी दुपारी आठ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. या आठही महिला आहेत. त्यातील दोघींना घरी सोडण्यात आले आहे. त्या दोघी फिरदौस कॉलनी व सुभाष चौक येथील रहिवासी आहेत. तर अन्य सहा महिलांना संस्थागत अलगीकरणात निरीक्षणात ठेवण्यात आले असून, त्या त दोघी जणी फिरदौस कॉलनी येथील तर अन्य रेवतीनगर, सुभाष चौक, माणिक टॉकीज जवळ, लोहिया नगर येथील रहिवासी आहेत.
आता सद्यस्थितीएकूण पॉझिटिव्ह अहवाल-३७८मयत-२३(२२+१),डिस्चार्ज-२१९दाखल रुग्ण ( पॉझिटिव्ह)-१३६