अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, या जीवघेण्या आजाराचा संसर्ग होणाऱ्यांची संख्या दिवसेंंदिवस वाढतच आहे. मंगळवार, २५ आॅगस्ट रोजी आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ११ जण पॉझिटिव्ह आढळून आले. यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ३ ,५५५ वर गेली आहे. दरम्यान, आणखी ३२ जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे सद्यस्थितीत ३५७ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.नागपूर व अमरावतीनंतर सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण अकोला जिल्ह्यात आढळून येत आहेत.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून मंगळवारी आरटीपीसीआर’ चाचणीचे १६० अहवाल प्राप्त झाले. यापैकी ११ जण पॉझिटिव्ह असून, १४९ जणांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. पॉझिटिव्ह आढळून आलेल्या ११ रुग्णांमध्ये पाच महिला व सहा पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये आदर्श कॉलनी व तेल्हारा तालुक्यातील रायखेड येथील प्रत्येकी तीन, गोरक्षण रोड येथील दोन जणांसह रतनलाल प्लॉट, अडगाव ता. तेल्हारा, खडकी येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.३२ जणांना डिस्चार्जमंगळवारी दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १० जण, कोविड केअर सेंटर येथून १२ जण, आयकॉन हॉस्पीटल येथून दोन जण, हॉटेल रेजेन्सी येथून दोन जण, हॉटेल रणजित येथून एक जण, कोविड केअर सेंटर, हेंडज ता. मुर्तिजापूर येथून पाच जण, अशा एकूण ३२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.३५७ जणांवर उपचार सुरुजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३५५५ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ३०५४ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १४४ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ३५७ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
CoronaVirus in Akola : दिवसभरात ३२ जण कोरोनामुक्त; ११ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 6:21 PM