अकोला : अकोल्यात कोरोनाचे थैमान सुरुच असून, या संसर्गजन्य आजारा लागण होणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढतच आहे. सोमवार, ६ जुलै रोजी जिल्ह्यात आणखी ३३ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यामुळे कोरोनाबाधितांची एकूण रुग्ण संख्या १७३६ वर गेली आहे.विदर्भात नागपूरनंतर सर्वाधिक कोरोनाबाधितांचे शहर अशी ओळख झालेल्या अकोल्यात रुग्णांचा व कोरोनाच्या बळींचा आकडा दररोज वाढत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून सोमवारी सकाळी एकूण २३१ जणांचे वैद्यकीय चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी ३३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. तर उर्वरित १९८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह ३३ अहवालांमध्ये १७ महिला तर १६ पुरुष रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये बाळापूर येथील ११, बोरगाव मंजू येथील पाच, जेल क्वार्टर येथील तीन, पोळा चौक येथील दोन, सिंधी कॅम्प येथील दोन, तर उर्वरित ज्ञानेश्वर नगर, मोठी उमरी, वानखडे नगर, कैलास नगर, आदर्श कॉलनी, वाशीम बायपास, महान, अकोट, खामगाव बुलडाणा व मालेगाव वाशीम येथील प्रत्येकी एकाचा समावेश असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.३८९ जणांवर उपचार सुरुजिल्ह्यात आतापर्यंत १७३६ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी आतापर्यंत १२५८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत ८९ जणांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत ३८९ जणांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.प्राप्त अहवाल-२३१पॉझिटीव्ह-३३निगेटीव्ह-१९८आता सद्यस्थितीएकूण पॉझिटीव्ह अहवाल- १७३६मयत-८९(८८+१)डिस्चार्ज - १२५८दाखल रुग्ण(अॅक्टीव्ह पॉझिटीव्ह)-३८९
CoronaVirus in Akola : आणखी ३३ पॉझिटिव्ह; एकूण बाधित १७३६
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2020 12:17 PM