अकोला : अकोल्या कोरोनाचा जोर कायमच असून, बाधित होणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. बुधवार, २ जून रोजी यामध्ये ३६ जणांची भर पडत एकूण रुग्णसंख्या ६६३ झाली आहे. बुधवारी सकाळी ३६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले. एकूण रुग्णांपैकी आतापर्यंत ४६२ बरे झाल्याने सद्यस्थितीत १६७ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.अकोला जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत असून, रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे अकोला जिल्हा सध्या कोरोनाचा विदर्भातील ‘हॉटस्पॉट’ ठरला आहे. मंगळवार, २ जूनपर्यंत कोरोनाबाधितांची संख्या ६२७ होती. यामध्ये बुधवारी आणखी ३६ रुग्णांची भर पडून हा आकडा ६६३ वर गेला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल लॅब’कडून बुधवारी सकाळी १११ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ३६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ७५ अहवाल निगेटिव्ह आहेत.आज सकाळी प्राप्त ३६ पॉझिटिव्ह रुग्णांपैकी १४ महिला व २२ पुरुष आहेत. त्यातील ११जण अकोट फैल येथील, पाच जण देशमुख फैल येथील, कैलास टेकडी येथील तीन, खदान येथील तीन, न्यू तार फैल येथील तीन, तर बाखरपुरा अकोट, अनिकट, बलोदे ले आउट- हिंगणा फाटा रोड, ध्रुव अपार्टमेंट जिल्हा स्त्री रुग्णालयासमोर, हिंद चौक, मोठी उमरी, रामदास पेठ, गुलजार पुरा, तार फैल, हरिहर पेठ, आदर्श कॉलनी येथील प्रत्येकी एक जण आहेत.आता सद्यस्थितीएकूण पॉझिटिव्ह अहवाल- ६६३मयत-३४(३३+१),डिस्चार्ज- ४६२दाखल रुग्ण (अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह)- १६७