अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, मंगळवार २२ सप्टेंबर रोजी आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ४१ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ६७१३ झाली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून मंगळवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे २०९ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ४१ अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १६८ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह निदान झालेल्या रुग्णांमध्ये जीएमसी येथील पाच, पारस व तेल्हारा येथील प्रत्येकी तीन, अष्टविनायक कॉलनी, मोठी उमरी, शिवाजी नगर, जूने शहर व खडकी येथील प्रत्येकी दोन, रेल ता. अकोट, आळशी प्लॉट, संतोष नगर, गोकूल कॉलनी, महसूल कॉलनी, डाबकी रोड, संकल्प कॉलनी, बाळापूर, हरिहर पेठ, बाशीर्टाकळी, चांदूर, अकोट, फीरदोस कॉलनी, चान्नी ता. पातूर, स्वराज्य पेठ, दहिगाव गावंडे, कौलखेड, अकोट फैल, राऊतवाडी व चोहट्टाबाजार येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे.आणखी १६ जण कोरोनामुक्तसोमवारी रात्री कोविड केअर सेंटर, अकोला येथून सहा जण, आयुर्वेदीक महाविद्यालयातून आठ जण, होटल रिजेन्सी येथून दोन जण, अशा एकूण १६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.१,७२५ अॅक्टिव्ह पॉझिटिव्हजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ६,७१३ लोकांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ४,७७७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २११ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत १,७२५ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.
CoronaVirus in Akola : आणखी ४१ पॉझिटिव्ह रुग्णांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2020 2:46 PM