अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, शनिवार, २२ आॅगस्ट रोजी दिवसभरात ४३ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ३४४१ वर गेली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून शनिवारी आरटीपीसीआर’ चाचणीचे ५३१ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ४३ जण पॉझिटिव्ह असून, तब्बल ४८८ जणांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या ३० जणांमध्ये १९ महिला व २४ पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये मुर्तीजापूर येथील ३३ जणांसह, अकोट तालुक्याती सावरा येथील पाच, खांबोरा येथील दोन, तर डाबकी रोड येथील एक, तेल्हारा तालुक्यातील गाडेगाव व इसापूर येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.२७ जणांना डिस्चार्जशनिवारी दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १८ जणांना, हॉटेल रणजित येथून दोन जणांना, कोविड केअर सेंटर, बाळापूर येथून एक जण, कोविड केअर सेंटर, बार्शिटाकळी येथून पाच जणांना तर कोविड केअर सेंटर, अकोट येथून एक अशा एकूण २७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.३५७ जणांवर उपचार सुरुजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३४४१ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल २९४१ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १४३ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ३५७ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
CoronaVirus in Akola : दिवसभरात ४३ पॉझिटिव्ह; २७ जण कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2020 6:16 PM