अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर थांबण्याची कोणतीही चिन्हे नसून, दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढतच आहे. रविवार, १९ जुलै रोजी दिवसभरात ४७ पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडल्याने एकूण रुग्णसंख्या २१३४ झाली आहे. तर मुर्तीजापूर येथील एकाचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळीचा आकडा १०३ वर गेला आहे. दरम्यान, रविवारी ४७ जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे सद्यस्थितीत ३०२ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून रविवारी दिवसभरात ‘आरटीपीसीआर’ चाचणीचे २८२ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ४७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. तर उर्वरित २३५ जणांचे वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये १८ महिला व २९ पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये अकोट येथील ३३ जण, मुर्तीजापूर येथील ११ जण, तर उर्वरित अकोला शहरातील जुना तारफैल, रामनगर व दगडी पुल भागातील रुग्णांचा समावेश असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.६० वर्षीय व्यक्तीचा मृत्यूकोरोनावर उपचार घेत असलेल्या मुर्तीजापूर येथील ६० वर्षीय पुरुषाचा शनिवारी रात्री मृत्यू झाला. सदर रुग्णास १६ जुलै रोजी सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यामुळे कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा १०३ झाली आहे.४७ जणांना डिस्चार्जरविवारी दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून आठ, कोविड केअर सेंटर मधून ३१, आयकॉन हॉस्पिटलमधून तीन, हॉटेल रिजेन्सी मधून पाच अशा एकूण ४७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.३०२ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरुआतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २१३४ असून, यापैकी १०३ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण १७२९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत ३०२ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.