अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, या जीवघेण्या आजाराचा संसर्ग होणाऱ्यांची संख्या दिवसेंंदिवस वाढतच आहे. सोमवार, २४ आॅगस्ट रोजी आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ४५ व रॅपिड चाचण्यांमध्ये २४ असे एकूण ६९ जण पॉझिटिव्ह आढळून आले. यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ३ ,५४४ वर गेली आहे. दरम्यान, १८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून सोमवारी दिवसभरात आरटीपीसीआर’ चाचणीचे २०३ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ४५ जण पॉझिटिव्ह असून, १५८ जणांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.यामध्ये यामध्ये एकट्या तेल्हारा शहरातील १३ व चांगेफळ येथील १० जणांसह, बाळापूर येथील सात जण, म्हैसपूर येथील चार जण, बोरगाव मंजू येथील दोन जणांचा समावेश आहे. याशिवाय अकोला शहरातील जवाहरनगर, चांदूर, कान्हेरी गवळी, डाबकी रोड, कावसा, देशमुख फैल, गोरेगाव, पोपटखेड व जूने शहर येथील प्रत्येकी एक रुग्णांचाही समावेश असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.रॅपिड चाचण्यांमध्ये २४ पॉझिटिव्हसोमवारी दिवसभरात झालेल्या १६५ रॅपिड अॅन्टिजेन चाचण्यामध्ये १० जण पॉझिटिव्ह आढळून आले. अकोला मनपा क्षेत्रात १५, आयएमएच्या कॅम्पमध्ये सात, अकोट व बार्शीटाकळी येथील प्रत्येकी एक असे एकूण १० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत ११५६७ चाचण्यांमध्ये ६१४ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.१८ जणांना डिस्चार्जसोमवारी दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १० जणांना, कोविड केअर सेंटर येथून दोन जण, उपजिल्हा रुग्णालय, मुर्तिजापूर येथून दोन जण, ओझोन हॉस्पीटल येथून एक जण, कोविड केअर सेंटर, हेंडज ता. मुर्तिजापूर येथून एक जण, तर कोविड केअर सेंटर बाशीर्टाकळी येथून दोन जणांना अशा एकूण १८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.३७८ जणांवर उपचार सुरुजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३५४४ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ३०२२ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १४४ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ३७८ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.