अकोला: अकोल्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होत असून, या संसर्गजन्य आजारामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची व संसर्ग होणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. शुक्रवार, १९ जून रोजी आणखी एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला. तर १५ नवे पॉझिटिव्ह समोर आले. यामुळे कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा ५९ वर गेला आहे. तर एकूण बाधितांची संख्याही ११२१ झाली आहे. दरम्यान, सद्या ३३८ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून शुक्रवारी सकाळी सांगण्यात आले.विदर्भातील दुसºया क्रमांकाचा कोरोनाबाधितांचा जिल्हा अशी कुप्रसिद्धी झालेल्या अकोल्यात मोठ्या संख्येने कोरोनाबाधित आढळून येत आहेत. कोरोनाच्या बळींचा आकडाही वाढतच आहे. गुरुवारपर्यंत जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ११०६ होती. शुक्रवारी यामध्ये १५ रुग्णांची भर पडत हा आकडा ११२१ झाला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शुक्रवारी सकाळी एकून २१६ चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी १५ पॉझिटिव्ह आहेत. तर उर्वरित २०१ अहवाल निगेटिव्ह आहेत. १५ पॉझिटिव्ह अहवालात आठ महिला व सात पुरुष आहेत. यामध्ये अकोटफैल येथील पाच, बाळापूर येथील चार, तर जेतवन नगर, कान्हेरी गवळी, भारती प्लॉट, जुने शहर, मोठी उमरी, बार्शीटाकळी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी असल्याचे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले आहे.दरम्यान, गुरुवारी रात्री उपचार घेताना आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला. सदर ८२ वर्षीय ही व्यक्ती हरीहरपेठ, अकोला येथील असून, त्यांना गुरुवारीच उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या मृत्यूमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा ५९ झाला आहे.आतापर्यंत ७२४ जणांना डिस्चार्जजिल्ह्यात आतापर्यंत ७२४ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आता ३३८ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहेत.प्राप्त अहवाल-२१६पॉझिटीव्ह-१५निगेटीव्ह-२०१आता सद्यस्थितीएकूण पॉझिटिव्ह अहवाल- ११२१मयत-५९(५८+१), डिस्चार्ज- ७२४दाखल रुग्ण (अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह)- ३३८