अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून,सोमवार, ७ सप्टेंबर रोजी अकोला शहरातील आणखी एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यामुळे कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा १६६ झाला आहे. दरम्यान, आणखी ६२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ४६७५ वर गेला आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून सोमवारी सकाळी आरटीपीसीआर चाचण्यांचे २१६ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ६२ पॉझिटिव्ह असून, उर्वरित १५४ जणांचा अहवाल निगेटिव्ह आहे. यामध्ये २४ महिला व ३८ पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये ३२ जण मुर्तिजापूर येथील, बेलुरा ता. पातुर येथील सात जण, पळसो बढे येथील चार जण, चिखली ता मुर्तिजापूर व लहान उमरी येथील तीन जण, अकोट व आळसी प्लॉट येथील प्रत्येकी दोन जण, तर जैन मंदिर, गणेश नगर,महसूल कॉलनी, तांडी, मलकापूर, खदान, खेतान नगर, बेलखेड ता. मुर्तिजापूर व कंचनपुरा पुरद येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.मोठी उमरी येथील पुरुषाचा मृत्यूकोरोनाबळींची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. अकोला शहरातील मोठी उमरीतील विठ्ठल नगर भागातील एका ५० वर्षीय पुरुषाचा सोमवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांना २ सप्टेंबर रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.१००४ अॅक्टिव्ह पॉझिटिव्हजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ४६७५ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ३५०५ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १६६ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत १००४ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
CoronaVirus in Akola : आणखी एकाचा मृत्यू; ६२ नवे पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2020 1:24 PM