अकोला : अकोल्यात कोरोनाचे थैमान सुरुच असून, सोमवार, ८ जून रोज आणखी एका जणाचा या आजारामुळे मृत्यू झाला. तर आणखी ८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यामुळे कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या ३८ झाली आहे. तर या संसर्गजन्य आजाराची बाधा होणाऱ्यांची एकूण संख्या ८२१ वर पोहचली आहे. सद्या २४३ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने सोमवारी दिली.विदर्भात सर्वाधिक कोरोनाबाधितांचा जिल्हा म्हणून अकोल्याची ओळख निर्माण झाली आहे. रविवार, ७ जून पर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा ८१३ होता. त्यामध्ये सोमवारी आठ जणांची भर पडत हा आकडा ८२१ वर पोहचला आहे. सोमवारी सकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून एकूण ६० चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी आठ पॉझिटिव्ह, तर उर्वरित ५२ निगेटिव्ह आहेत. आज सकाळी प्राप्त अहवालात एक महिला व सात पुरुष पॉझिटिव्ह आहेत. त्यातील दोन जण रजपुतपुरा येथील रहिवासी आहेत. तर उर्वरित बलोदे ले आउट, नीता गेस्ट हाऊस कलाल की चाल, अकबर प्लॉट अकोट फैल, हनुमान बस्ती संतोषी माता मंदिर,माळीपूरा, गायत्री नगर येथील प्रत्येकी एक जण याप्रमाणे रहिवासी आहेत.दरम्यान, सोमवारी पहाटे एका रुग्णाचा उपचार घेताना मृत्यू झाला. हा रुग्ण नायगाव येथील ४५ वर्षीय पुरुष असून, त्याला ३ जून रोजी दाखल करण्यात आले होते. आज पहाटे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. आज एकाच्या मृत्यूमुखी कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा ३८ वर पोहचला आहे. एका कोरोनाबाधिताच्या आत्महत्येची नोंद आहे. आतापर्यंत ५४० जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे सद्यस्थितीत २४३ जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
प्राप्त अहवाल-६०पॉझिटीव्ह-आठनिगेटीव्ह-५२
आता सद्यस्थितीएकूण पॉझिटिव्ह अहवाल-८२१मयत-३८(३७+१),डिस्चार्ज-५४०दाखल रुग्ण (अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह)-२४३