शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
7
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
8
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
9
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
10
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
11
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
12
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
13
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
14
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
15
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
16
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
17
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
18
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
19
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
20
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?

CoronaVirus in Akola : डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय नागरिक खरेदी करताहेत ‘हायड्रोक्सी क्लोरोक्विन’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 11:25 AM

अकोलेकरांनी डॉक्टरांच्या सल्ल्याविनाच ही औषध खरेदी केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

अकोला: कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांसह इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांची प्रतिकारशक्ती कायम राखण्यासाठी ‘हायड्रोक्सी क्लोरीक्विन’ औषध घेण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांच्या समितीने दिला आहे; मात्र ही माहिती सोशल मीडियावर व्हायरल होताच अकोलेकरांनी डॉक्टरांच्या सल्ल्याविनाच ही औषध खरेदी केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.‘आयसीएमआर’च्या मार्गदर्शक सूचनेनुसार, कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाºयांनी डॉक्टरांसह इतर वैद्यकीय कर्मचारी गरजेनुसार, ‘हायड्रोक्सी क्लोरोक्विन’ या औषधाचा उपयोग करूशकतात; पण ही माहिती सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने अनेकांनी त्याचे फायदे, तोटे न जाणता ‘हायड्रोक्सी क्लोरोक्विन’च्या गोळ्या खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. परिणामी, दवा बाजारात या औषधांचा तुटवडा उद्भवला आहे. शिवाय, गरजू रुग्णांना ही औषधे मिळत नसल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. ही औषधे डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय दिली जात नसल्याने, अनेकांनी कौटुंबिक डॉक्टरांच्या चिठ्ठीचा आधार घेतल्याचेही वास्तव आहे. काहींनी अव्वाच्या सव्वा दराने थेट औषध दुकानदारांकडूनच खरेदी केल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. परिणामी, शहरातील अनेक दुकानांतील औषधे संपली असून, खरेच गरज असलेल्या रुग्णांना ही औषधे मिळत नसल्याने त्यांची पंचाईत होत आहे.यांच्या आरोग्याला धोकावृद्ध, मधुमेह, हृदयरुग्णांसह इतर जोखमेतील व्यक्तींनी या गोळ्यांचे सेवन केल्यास त्यांच्या आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतो.या रुग्णांना दिले जाते हे औषध!हिवताप, जॉइंट पेन, कुष्ठरुग्णांना आलेली रिअ‍ॅक्शनसह इतर काही संवर्गातील रुग्णांना डॉक्टर आवश्यक्तेनुसार ‘हायड्रोक्सी क्लोरोक्विन’ २०० एमजी किंवा ४०० एमजी, तसेच इतर औषध घेण्याचा सल्ला त्यांच्या शरीरयष्टी आणि आरोग्याच्या दृष्टीने देतात.‘हायड्रोक्सी क्लोरोक्विन’औषधचा उपयोग प्रामुख्याने हिवतापावर उपचार किंवा प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी केला जातो. दरम्यान ‘आयसीएमआर’च्या मार्गदर्शक सूचनानंतर हे औषध कोरोनाग्रस्तांचा उपचार करणाºया डॉक्टरांना घेण्याचा सल्ला तज्ज्ञांच्या समितीने दिला आहे; परंतु अनेकांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय या औषधांची खरेदी केल्याने त्याचा तुटवडा आहे. नागरिकांनी या गोळ्या औषध दुकानात परत कराव्यात.- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला.

 

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस