अकोला : गत काही महिन्यांपासून जिल्ह्यात धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना संसर्गाचा वेग कमी झाला असला, तरी मृत्यूचे सत्र मात्र सुरुच आहे. मंगळवार, ६ आॅक्टाबर रोजी तेल्हारा तालुक्यातील एकाचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा २४५ वर गेला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये २१ नवे पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ७६७० झाली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून मंगळवारी सकाळी आरटीपीसीआर चाचण्यांचे १६७ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २१ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १४६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह निदान झालेल्या रुग्णांमध्ये मूर्तिजापूर येथील पाच जणांसह अकोट व प्रसाद नगर येथील प्रत्येकी दोन, राम नगर डाबकी रोड, बाळापूर नाका, अर्शद नगर, न्यू तापडिया नगर, शांती नगर, वानखडे नगर, हिंगणा रोड, सिंधी कॅम्प, देशमुख फाईल, जऊळका ता.अकोट, मलकापूर व दहिगाव ता. तेल्हारा येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे.दहीगाव येथील पुरुषाचा मृत्यूमंगळवारी आणखी एका कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा रुग्ण तेल्हारा तालुक्यातील दहीगाव येथील ५० वर्षीय पुरुष असून, त्यांना ३ आॅक्टोबर रोजी दाखल करण्यात आले होते.८५६ अॅक्टिव्ह पॉझिटिव्हजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ७,६७० जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ६५६९ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २४५ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ८५६ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.
CoronaVirus in Akola : आणखी एकाचा मृत्यू; २१ नवे पॉझिटिव्ह रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2020 12:19 PM