शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण कोरियात मार्शल लॉची घोषणा, राष्ट्रपती यून सुक-योल म्हणाले, "देशविरोधी शक्तींचा अंत होईल"!
2
Video: विनोद कांबळीला पाहताच सचिन तेंडुलकर भेटायला गेला, त्याला पाहून 'बालमित्र' भावूक झाला...
3
अंबाजोगाईत साडे दहा लाखांचा गुटखा पकडला; शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; दोघे ताब्यात
4
शेतातील शेडवर छापा; २ लाखांचा गुटख्या जप्त, एक ताब्यात; दहशतवादविराेधी शाखेची कारवाई
5
अपहरण झालेल्या दाेन मुलींची हैदराबादमधून सुटका; दाेन आराेपी अटकेत, AHTU शाखेची कारवाई
6
अमरावती विद्यापीठात अधिष्ठाता पदभरतीतून आरक्षणाचा ‘बिंदू’ गायब, अखेर 'ती' जाहिरात रद्द
7
संभल हिंसाचाराचं पाकिस्तान कनेक्शन! 3 पुरावे ओरडून-ओरडून देतायत साक्ष; फॉरेन्सिक टीमनं नाल्या खंगाळल्या
8
“निवडणुकीत आम्हाला थर्ड अंपायर मिळाला असता तर अनेक निकाल बदलले असते”: राज ठाकरे
9
UPI मुळे ATM ला फटका! 5 वर्षात प्रथमच एटीएमची संख्या घटली; ग्रामीण भागात काय स्थिती?
10
वाह.. क्या बात है! विराट-रोहितची एकत्रित नेट प्रक्टिस पाहायला ऑस्ट्रेलियन फॅन्सची गर्दी (Video)
11
निर्मला सीतारामन यांना मोठा दिलासा; कर्नाटक हायकोर्टाने रद्द केला 'इलेक्टोरल बाँड'चा खटला...
12
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना भेटण्यासाठी देवेंद्र फडणवीस 'वर्षा'वर; नेमकी कोणती चर्चा झाली?
13
7 कॅबिनेट मंत्रीपदं, दोन राज्यमंत्रीपदं, एक राज्यपालपद अन्...; अजित दादा काय-काय मागणार?
14
“...तर एकनाथ शिंदे कधी उद्धव ठाकरेंना सोडून बाहेर पडले नसते”; भाजपा नेत्याची टीका
15
"आपणच सर्व उत्तरं द्या...!"; मोदी सरकारमधील मंत्र्यांवर का नाराज झाले ओम बिरला? भरसंसदेत म्हणाले...
16
Pappu Yadav : मोठा खुलासा! पप्पू यादव यांना सुरक्षा मिळावी म्हणून जवळच्यांनी रचला 'धमकीचा ड्रामा'
17
Airtel आणि Jio चा 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लॅन; मिळेल फास्ट इंटरनेट
18
निर्मला सीतारामन जिथे 'निरीक्षक' म्हणून गेल्या, तिथे कसा होता भाजपाचा मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला?
19
“मोदी-शाह, १० हजार लाडक्या बहिणी, २ हजार शेतकरी शपथविधीला येणार”; भाजपा नेत्याने यादीच वाचली
20
"आम्ही कधीही लग्न करणार नाही’’, १२ तरुणींनी घेतला अजब निर्णय, कारण काय? 

CoronaVirus in Akola : आणखी एकाचा मृत्यू; ३३ नवे पॉझिटिव्ह, ५० कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 5:53 PM

शुक्रवार, २४ जुलै रोजी दिवसभरात  मुर्तीजापूर तालुक्यातील एका जणाचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देशुक्रवार, २४ जुलै रोजी दिवसभरात  मुर्तीजापूर तालुक्यातील एका जणाचा मृत्यू झाला.

अकोला : अकोल्यात कोरोनाचा हैदोस सुरुच असून, या संसर्गजन्य आजाराने मृत्यूमुखी पडणाऱ्यांची व नव्याने बाधित होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. शुक्रवार, २४ जुलै रोजी दिवसभरात  मुर्तीजापूर तालुक्यातील एका जणाचा मृत्यू झाला. तर ३३ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा एकूण आकडा ९९ झाला आहे. तर एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २३३४ झाली आहे. दरम्यान, ५० जणांना डिस्चार्ज देण्यात आला.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून बुधवारी ‘आरटीपीसीआर’ चाचणीचे ११० अहवाल प्राप्त झाले. यापैकी ३३ अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ७७ अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये सात महिला व २६ पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये मध्यवर्ती कारागृहातील १५ जणांसह, रामदासपेठ येथील तीन, महान येथील तीन जण, मोठी उमरी, लोटनपूर व केशव नगर येथील प्रत्येकी दोन जण, अडगाव बु., कुटासा, जूने शहर, खदान, वाडेगाव व जेल क्वॉटर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.मुर्तीजापूर तालुक्यातील एकाचा मृत्यूशुक्रवारी मुर्तीजापूर तालुक्यातील बारामी खुर्द येथील ६२ वर्षीय वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांना २० जुलै रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.५० जणांना डिस्चार्जशुक्रवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १० जणांना, कोविड केअर सेंटर अकोला येथून २९ जण, ओझोन हॉस्पिटल येथून दोन जणांना तर हॉटेल रेजेन्सी येथून नऊ जणांना अशा एकूण ५० जणांना डिस्चार्ज देण्यात आला. सद्या ३८७ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.परजिल्ह्यातील ५६ पॉझिटिव्ह, आठ मृत्यू वगळलेअकोला जिल्हा बाहेरील ५६ पॉझिटिव्ह व सात मयत व एक आत्महत्या असे एकूण आठ मयत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता यांनी दिलेल्या पत्रानुसार अहवालातून वगळण्यात आले आहे.एकूण पॉझिटीव्ह अहवाल- २१११+२२३=२३३४मयत-९९डिस्चार्ज- १८४८दाखल रुग्ण (अ‍ॅक्टीव्ह पॉझिटीव्ह)-३८७

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला