अकोला : अकोल्यात कोरोनाचा कहर थांबण्याचे नावच घेत नसून, या संसर्गजन्य आजाराला बळी पडणाऱ्यांची व लागण होणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढतच आहे. रविवार, ५ जुलै रोजी आणखी एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर ३८ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यामुळे कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा ८९ झाला आहे. तर एकूण रुग्ण संख्या १७०३ वर गेली आहे.विदर्भात नागपूरनंतर सर्वाधिक कोरोनाबाधितांचे शहर अशी ओळख झालेल्या अकोल्यात रुग्णांचा व कोरोनाच्या बळींचा आकडा दररोज वाढत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून रविवारी सकाळी एकूण ११९ जणांचे वैद्यकीय चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी ३८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. तर ८१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह ३८ अहवालांमध्ये ११ महिला व २७ पुरुष आहेत. त्यातील आठ जण पक्की खोली येथील, सात जण आदर्श कॉलनी, सात जण अकोट, पाच जण चांदुर, दोन जण बार्शीटाकळी, दोन जण कच्ची खोली, तर उर्वरित राधाकिसन प्लॉट, जुने शहर, वाडेगाव,पातुर, साईनगर, महान आणि नानक नगर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या १७०३ झाली आहे. आतापर्यंत १२५५ जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे सद्यस्थितीत ३५९ अॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.सिंधी कॅम्पमधील एकाचा मृत्यूसिंधी कॅम्प येथील एका ८२ वर्षीय वृद्धाचा शनिवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. सदर व्यक्तीस २ जून रोजी दाखल करण्यात आले होते. या व्यक्तीच्या मृत्यूमुळे जिल्ह्यातील कोरोनाच्या बळींची संख्या ८९ झाली आहे.प्राप्त अहवाल-११९पॉझिटीव्ह-३८निगेटीव्ह-८१आता सद्यस्थितीएकूण पॉझिटीव्ह अहवाल-१७०३मयत-८९(८८+१)डिस्चार्ज १२५५दाखल रुग्ण( अॅक्टीव्ह पॉझिटीव्ह)-३५९