अकोला : जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरूच असून मृतकांची संख्या चिंता वाढवित आहे. अशातच रविवारी आणखी दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. मृत्यूच्या वाढत्या संख्येमुळे परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून, दुसरीकडे २९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण रुग्णसंख्येचा आकडा ११९२ वर पोहोचला आहे.जिल्ह्यात कोरोनामुळे दररोज एकाचा बळी जात असून आतापर्यंतचा मृत्यूचा आकडा ६६ वर पोहोचला आहे. मृत्यूची वाढते प्रमाण चिंताजनक असतानाच दुसरीकडे रुग्णसंख्याही झपाट्याने वाढत आहे. मृत्यूचेहे सत्र रविवारीही सुरूच असून, आणखी दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. मृत्यू झालेल्यांमध्ये नायगांव येथील ४८ वर्षीय पुरुष रुग्णांचा रविवारी मृत्यू झाला. ते ८ जून रोजी दाखल झाले होते. तसेच शेगांव जि. बुलडाणा येथील ५० वर्षीय महिला रुग्णांचा काल शनिवारी मृत्यू झाला असून ती १९ जून रोजी दाखल झाली होती. तर दुसरीकडे २९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आला. सकाळी प्राप्त १५ पॉझिटिव्ह अहवालामध्ये पांच महिला व दहा पुरुष आहे. त्यात शंकरनगर व गुलजारपूरा येथील प्रत्येकी तीन, अकोट फाईल येथील दोन, तर गीतानगर, सिंधी कॅम्प अकोट, साबरीपुरा इंदिरानगर, वाशिम बायपास, वृंदावन नगर, नाना उजवणे जवळ, लाडीजफाईल येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. यातील तेरा अहवाल अकोट फाईल येथील मनपा स्वॅब संकलन केन्द्रावरील आहेत. तर सायंकाळी प्राप्त पॉझिटीव्ह अहवालांमध्ये सात महिला व सात पुरुष आहे. त्यातील अकोट, शंकर नगर व लाडीज फाईल येथील प्रत्येकी दोन तसेच शेगांव जि. बुलडाणा, वाडेगांव, हरिहर पेठ, जूने शहर, कोळंबी महागांव, अशोक नगर, मोचीपुरा आणि लक्ष्मी नगर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. यातील सात अहवाल अकोट फाईल येथील मनपा स्वॅब संकलन केन्द्रावरील आहेत. आतापर्यंत एकूण रुग्णांची संख्या ११९२ वर पोहोचली आहे. त्यातील ७६२ जणांना डिस्चार्ज दिला असून, सद्या ३६४ रुग्णांवर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.आता सद्यस्थितीएकूण पॉझिटिव्ह अहवाल-११९२मृत्यू -६६(६५+१)डिस्चार्ज-७६२अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह -३६४
CoronaVirus in Akola : आणखी दोघांचा मृत्यू; २९ पॉझिटिव्ह!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2020 7:32 PM