अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, शनिवार, १८ जुलै रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून प्राप्त ‘आरटीपीसीआर’ चाचणी अहवालांमध्ये दिवसभरात आठ जण पॉझिटिव्ह आढळून आले. तर आणखी दोघांचा मृत्यू झाला. यामुळे कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा १०२ झाला, तर एकूण बाधितांची संख्या २,०६५ झाली आहे. दरम्यान, आणखी १५ जण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारीदिवसभरात २२९ जणांचे वैद्यकीय चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी २२१ निगेटिव्ह, तर आठ पॉझिटिव्ह आढळून आले. सकाळी पॉझिटिव्ह आढळून आलेले चौघेही पुरुष असून, यामध्ये बोरगाव मंजू येथील तीन, तर अकोट तालुक्यातील अकोली जहांगिर येथील एकाचा समावेश आहे. सायंकाळी पॉझिटिव्ह आलेल्या चार अहवालांमध्ये दोन महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये तीन जण बोरगाव मंजू येथील, तर मुर्तीजापूर येथील एकाचा समावेश असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.अकोट येथील दोघांचा मृत्यूकोरोनामुळे शनिवारी आणखी दोघांचा मृत्यू झाला. हे दोघेही अकोट येथील असून, त्यापैकी एक जण ७६ वर्षीय, तर दुसरा ५४ वर्षीय आहे. या दोन्ही रुग्णांना १० जुलै रोजी दाखल करण्यात आले होते.१५ जणांना डिस्चार्जशनिवारी दुपारनंतर कोविड केअर सेंटर मधून १०, आयकॉन हॉस्पिटल येथून तीन व हॉटेल रिजेन्सी मधून दोन अशा एकूण १५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती कोविड केअर सेंटर येथून देण्यात आली.२८१ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरुआतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २०६५ असून, यापैकी १०२ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण १६८२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत २८१ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.